Sayaji Shinde: 'झाडं तोडून होणारा विकास खोटारडा'; सयाजी शिंदे संतापले, झाडतोडीविरोधात आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन

Sayaji Shinde: अभिनेता सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील वृक्षतोडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. झाडे वाचवण्यासाठी आरती, थाळीनाद आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
Sayaji Shinde
Sayaji ShindeSaam Tv
Published On: 

Sayaji Shinde : विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता आणि सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी झाडतोडीविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रातील जंगलं, झाडं आणि निसर्ग वाचवण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'झाडं तोडून होणारा विकास खोटारडा आहे', अशा शब्दांत त्यांनी प्रशासन आणि यंत्रणांवर टीका केली. तसेच नागरिक, कलाकार आणि डॉक्टरांनीही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

'झाडं वाचवण्यासाठी आता जागे व्हा'

नागपुरात सह्याद्री वाचवा निसर्ग वाचवा या विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी झाडतोडीच्या मुद्द्यावर बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील झाडं आणि जंगलं नष्ट केली जात आहेत. विकासाच्या नावाखाली सह्याद्रीला हात घातला जात आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी जागे होण्याची गरज आहे. राज्याला वाळवंट बनवायचे आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून निसर्ग वाचवण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sayaji Shinde
Director Death: मनोरंजन विश्वातील तारा हरपला, ज्येष्ठ दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, ठाण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

पुढे ते म्हणाले, "विजेशिवाय माणूस जगू शकतो, पण ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाही. ऑक्सिजन झाडांमधून मिळतो. त्यामुळे झाडांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. झाड नसेल तर माणूसही राहणार नाही." एका वडाच्या झाडावर जवळपास ४०० प्रजाती अवलंबून असतात, झाड कापू देऊ नका... झाड नसेल तर माणूस नसेल... असे ते म्हणाले.

५०० एकर परिसरातील ११ लाख झाडे तोडल्याचा दावा

एका प्रकल्पासाठी ५०० एकर जमिनीवरील तब्बल ११ लाख झाडे तोडली जात असल्याचा दावा सयाजी शिंदे यांनी केला. झाडे तोडून पुन्हा वृक्षारोपण केल्याचे दाखवणे पुरेसे नाही. प्रत्येक जिल्ह्यात किती झाडे लावली आणि त्यापैकी किती जगली, याचा हिशोब प्रशासनाने द्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. झाडांच्या व्याख्येत केवळ मोठ्या वृक्षांचा समावेश न करता वेली, गवत आणि झुडपांचाही विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Sayaji Shinde
Yetech Aata Me Nandayla: बांदेकरांची सून झळकणार नव्या मालिकेत, लोकप्रिय अभिनेत्यासोबत जमणार जोडी; तारीख अन् वेळ जाहीर!

आरती, थाळीनाद करून आंदोलन करण्याचे आवाहन

424 शहरात झाडखाऊ नावाचा व्हायरस कोविडनंतर आला, त्याला पळवुन लावायचा आहे. झाडतोडीविरोधात नागरिकांनी दररोज आरती, थाळीनाद आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले. थाळी वाजवण्यामुळे ध्वनीप्रदूषण होईल, अशी चिंता करण्यापेक्षा निसर्ग वाचवण्याला प्राधान्य द्यायला हवे. ऑक्सीजन पंतप्रधान किंवा कोणी देत नाही, झाड तोडायला आलेल्या आपण तोडून टाकू, असेही ते म्हणाले.

कलाकारांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही सयाजी शिंदे यांनी विशेष आवाहन केले. केवळ चित्रपट काढण्यापेक्षा आता पर्यावरण आणि आपले घर वाचवण्यासाठी मैदानात उतरावे. झाडे लावण्यासोबतच ती जगवण्याची जबाबदारीही घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच वृक्षसंवर्धनासाठी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. छत्रपती नावाने मत मागायचे आणि गड किल्ले नष्ट करायचे, विकासाचा नावाखाली आपण सह्याद्रीला हात घालत आहे. सह्याद्री हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे विकास करताना निसर्गाचा विनाश होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. झाडे वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत सयाजी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.