Toxic Collection : 'टॉक्सिक'ची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई; 'धुरंधर'वर भारी पडला यश, कलेक्शन वाचून व्हाल थक्क

Yash-Toxic Box Office Collection : यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'टॉक्सिक' सिनेमा 'धुरंधर २' ला तगडी टक्कर देत आहे. एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.
Yash-Toxic Box Office Collection
Toxic CollectionSAAM TV
Published On
Summary

'टॉक्सिक'ने पहिल्याच दिवशी थिएटर गाजवले

'टॉक्सिक' चित्रपट 'धुरंधर २'ला देतोय तगडी टक्कर

बॉक्स ऑफिसवर यशची क्रेझ

साउथ सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक' (Toxic) चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस हादरवले आहे. 'टॉक्सिक' चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ (बुधवारी) थिएटरमध्ये रिलीज झाला. गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक' चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'टॉक्सिक' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'टॉक्सिक'ने भारतात पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये मिळून अंदाजे १०१.१० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे, तर त्याचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन १४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पहिल्या दिवशी १०३ कोटींची कमाई करणाऱ्या 'धुरंधर २' (Dhurandhar 2) नंतर भारतीय चित्रपटासाठी ही दुसरी सर्वोत्तम ओपनिंग ठरली आहे.

'टॉक्सिक'ची भाषांनुसार पहिल्या दिवशी कमाई

  • हिंदी: ५५.०० कोटी रुपये

  • कन्नड: २३.३० कोटी रुपये

  • मल्याळम: १.३० कोटी रुपये

  • तमिळ: ५.५० कोटी रुपये

  • तेलुगू: १६.०० कोटी रुपये

  • भारतातील एकूण नेट कमाई - १०१.१० कोटी रुपये

'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' (Toxic: A Fairy Tale for Grown-Ups) मध्ये यशसोबत अनेक अभिनेत्री झळकल्या आहेत. यात नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि हुमा कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय ओबेरॉय आणि सुदेव नायर यांचाही यात समावेश आहे. 'टॉक्सिक' हा ॲक्शन-पॅक्ड ड्रामा आहे. लवकरच 'टॉक्सिक' ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Yash-Toxic Box Office Collection
Tharala Tar Mag : गरोदर सायली बनली लेडी सिंघम, अर्जुनसोबत सिक्रेट मिशनला सुरुवात, 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com