Toxic : यशचा भयानक अवतार अन् जबरदस्त ट्विस्ट; 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून थक्क व्हाल, अवघ्या ४ मिनिटांत सोशल मीडिया हादरले| VIDEO

Toxic Trailer Out : यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरमध्ये यशचा खतरनाक अवतार पाहायला मिळत आहे.
Toxic Trailer Out
ToxicAI PHOTO
Published On
Summary

'टॉक्सिक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

यशचा भयानक अवतार पाहून चाहते थक्क

यश आणि कियाराच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा

साऊथ अभिनेता यशचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'टॉक्सिक' चा (Toxic: A Fairy Tale for Grown-Ups) अखेर ट्रेलर रिलीज झाला आहे. हा एक ॲक्शन ड्रामा आहे. 'टॉक्सिक'च्या ट्रेलरमध्ये यशचा खतरनाक अवतार समोर आला आहे. ट्रेलरमध्ये ॲक्शन, रोमान्स आणि गँगस्टर पार्श्वभूमी पाहायला मिळत आहे.

'टॉक्सिक' चा ट्रेलर धोका, सत्ता आणि अनपेक्षित स्वभावाच्या पात्रांभोवती फिरतो. यशचा रांगडा लूक उठून दिसतो. हा चित्रपट प्रेक्षकांना गुन्हेगारी, सत्ता आणि विश्वासघाताच्या धोकादायक विश्वात घेऊन जाणार आहे. गँगस्टर ड्रामा, रोमान्स आणि भव्य ॲक्शन यांचा सुंदर मेळ म्हणजे 'टॉक्सिक' होय. चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

ट्रेलरमध्ये रोमँटिक पैलूचीही झलक मिळते. गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटात यश मुख्य भूमिकेत असून, नयनतारा, कियारा अडवाणी, रुक्मिणी वसंत, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया या अभिनेत्रींच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा गँगस्टर ड्रामा १९४० ते १९७० च्या दशकातील गोव्यातील अमली पदार्थांचा व्यापार आणि माफियांच्या जाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे समजते.

Toxic Trailer Out
Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर भयंकर दुर्घटना; पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय झालं?

'टॉक्सिक' चित्रपटात पिरियड ड्रामा, ॲक्शन, क्राईम आणि रोमान्स यांचा भव्य संगम पाहायला मिळणार आहे. 'केजीएफ'नंतर यश पुन्हा एकदा एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. 'टॉक्सिक' चित्रपट २६ ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'टॉक्सिक'च्या ट्रेलरवर प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यामातून कमेंट्सचा वर्षाव करत आहे. काहींना ट्रेलर खूपच आवडला आहे. तर काही युजरर्स यशच्या अंदाजाचे कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com