New Marathi Serial : 'याड' नाही तर 'ओढ' लावणारी लव्हस्टोरी! नव्या मराठी मालिकेची घोषणा, मुख्य भूमिकेत कोण अन् रिलीज डेट काय?

New Marathi Serial Teaser : एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साताऱ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या मालिकेत प्रेम आणि देशभक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
New Marathi Serial Teaser
New Marathi SerialSAAM TV
Published On: 
Summary

नव्या मराठी मालिकेचा दमदार टीझर समोर

साताऱ्यात रंगणार अनोखी कथा

पाहायला मिळणार देशभक्ती अन् प्रेमाचा अनोखा संगम

मराठी मनोरंजनविश्वात सध्या नव्या मालिकांची चर्चा रंगताना दिसत आहे. प्रेक्षकांना नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील कथा देणारी कलर्स मराठी वाहिनी आता आणखी एक नवी मालिका घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी प्रेक्षकांना केवळ प्रेमकथा पाहायला मिळणार नाही, तर या कथेला देशप्रेम आणि देशसेवेचीही पार्श्वभूमी असणार आहे.या मालिकेचा टीझर AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे टीझरमधील दृश्यांमध्ये एक वेगळेपणा पाहायला मिळतो.

नवीन मालिकेचे नाव काय?

कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या नव्याकोऱ्या मालिकेचे नाव 'लागलिया ओढ जिवा' असं आहे. मालिकेच्या पहिल्या टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र अद्याप मालिकेची रिलीज डेट आणि वेळा जाहीर करण्यात आली नाही. मालिकेच्या टीझरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. टीझरला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "साताऱ्याच्या मातीत देशप्रेमाचं सपान पुरं व्हणार आन् प्रेम फुलणार! येतेय एक नवी 'खट' लवस्टोरी, जी नुसतं 'याड' नाय 'ओढ' बी लावणार...'लागलिया ओढ जीवा', लवकरच कलर्स मराठीवर"

साताऱ्याच्या मातीत फुलणार प्रेमकहाणी

'लागलिया ओढ जिवा' या मालिकेची पार्श्वभूमी साताऱ्याची आहे. साताऱ्याच्या मातीतील रांगडेपणा, तिथली खास बोलीभाषा आणि स्थानिक संस्कृतीचा गोडवा या टीझरमध्ये पाहायला मिळतो. याच वातावरणात एका तरुण जोडप्याची प्रेमकहाणी फुलताना दिसणार आहे. मात्र या प्रेमकथेचं वैशिष्ट्य म्हणजे या दोघांचं स्वप्न केवळ एकमेकांसोबत आयुष्य घालवण्यापुरतं मर्यादित नाही. देशासाठी काहीतरी करण्याची आणि मातृभूमीची सेवा करण्याची इच्छा या दोघांच्याही मनात आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमप्रवासाला देशभक्तीची एक वेगळी किनार लाभणार आहे.

New Marathi Serial Teaser
Ramayana Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर पुन्हा धमाका! १५व्या दिवशी रचला नवा विक्रम, कमाई वाचून व्हाल थक्क

टीझरमधील संवादाने वेधलं लक्ष

मालिकेच्या टीझरमधील खास संवादाने लक्ष वेधून घेतले आहे. "साताऱ्याची हवाच भारी, मातीत भिनलीया पिरतीची खुमारी...पण दोघांचं बी सपान एकच हुतं, आधी देशासाठी संग झटायचं अन मंग पिरमात रंगायचं!" या संवादातून मालिकेच्या कथेची दिशा स्पष्ट होते. प्रेमात रमण्यापूर्वी देशासाठी आपलं योगदान देण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या जोडीची गोष्ट प्रेक्षकांसाठी नक्कीच वेगळी ठरणार आहे. प्रेम, त्याग, जिद्द आणि देशसेवेची भावना या सगळ्यांचा संगम मालिकेत पाहायला मिळणार आहे.

मुख्य कलाकारांचे चेहरे गुलदस्त्यात

या मालिकेच्या टीझरमधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मुख्य कलाकारांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. टीझरमध्ये तरुण जोडप्याची झलक दाखवण्यात आली असली, तरी त्यांच्या चेहऱ्यांबाबत गुपित कायम ठेवण्यात आलं आहे.टीझरच्या शेवटी हे दोघेही एनसीसी कॅडेट्सच्या गणवेशात दिसतात. त्यामुळे मालिकेतील पात्रांचा देशसेवेशी असलेला संबंध अधिक ठळकपणे समोर येतो. या नव्या जोडीची निवड कोणाची झाली आहे, त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल आणि ही प्रेमकहाणी कोणतं वळण घेणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

एकीकडे प्रेमाची हळुवार भावना आणि दुसरीकडे देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द, अशा वेगळ्या विषयाची मांडणी या मालिकेतून होणार आहे. त्यामुळे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का आणि साताऱ्याच्या मातीत फुलणारी ही प्रेमकहाणी किती लोकप्रिय ठरते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.