Ramayana Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर पुन्हा धमाका! १५व्या दिवशी रचला नवा विक्रम, कमाई वाचून व्हाल थक्क

Ramayana Box Office Collection Day 15 : रणबीर कपूर आणि यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस दमदार कामगिरी पाहायला मिळाली. चित्रपटाने १५ दिवसांत किती कमावले जाणून घेऊयात.
Ramayana Box Office Collection Day 15
Ramayana CollectionSAAM TV
Published On: 
Summary

'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड'ने १५व्या दिवशी केली कोटींची कमाई

रणबीर कपूर आणि यश यांच्या चित्रपटाचा जगभरात बोलबाला

'रामायण'ने रचला जगभरात इतिहास

रणबीर कपूर आणि यशचा 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise of a Legend) या चित्रपटाने १५ दिवसांत कोट्यवधींचा व्यवसाय केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाची जागतिक स्तरावरील एकूण कमाई १,५४७.१५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यातील संघर्ष, सीतेचे अपहरण, रामाचा वनवास आणि सत्य-असत्यातील युद्ध अशा रामायणातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे भव्य सिनेमॅटिक चित्रण या चित्रपटात पाहायला मिळत आहे. 'रामायण' चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज झाला.

'रामायण' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १५

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, गुरुवारी म्हणजे रिलीजच्या १५ व्या दिवशी 'रामायण' चित्रपटाने भारतात १९.३५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. चित्रपटाने विविध भाषांमधील एकूण २१,४३७ शोद्वारे ही कमाई नोंदवली आहे. यात हिंदी आवृत्तीचा वाटा सर्वाधिक असून, १७,४२८ शोमधून १४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. मल्याळम आवृत्तीने ९३७ शोद्वारे १.७५ कोटी रुपये, तर तमिळ आवृत्तीने १,१५८ शोद्वारे १.५० कोटी रुपयांची कमाई केली. कन्नड आवृत्तीने ८८४ शोद्वारे १.४० कोटी रुपये आणि तेलुगू आवृत्तीने १,०३० शोद्वारे ७० लाख रुपयांची कमाई केली.

जागतिक कमाई १,५४७ कोटी रुपयांच्या पार

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड'ची भारतातील एकूण नेट कमाई ८६३.७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. देशांतर्गत एकूण ग्रॉस कलेक्शन १,०३२.१५ कोटी रुपये इतकी आहे. परदेशातही चित्रपटाची कामगिरी उल्लेखनीय राहिली असून, १५ व्या दिवशी ५ कोटी रुपयांची भर पडली आहे. यामुळे परदेशातील एकूण कमाई ५१५ कोटी रुपयांवर पोहोचली असून, जागतिक स्तरावरील एकूण कमाई १,५४७.१५ कोटी रुपयांवर गेली आहे.

'रामायण' हा दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा भव्य पौराणिक चित्रपट असून नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वाल्मिकी रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय रवी दुबे लक्ष्मण आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Ramayana Box Office Collection Day 15
Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अवघ्या ४ महिन्यात गाशा गुंडाळणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.