Ramayana Collection : 'रामायण' ठरला बॉक्स ऑफिसचा किंग! रणबीर-यशच्या चित्रपटाने रचला बॉलिवूडमध्ये इतिहास, आतापर्यंत किती कोटींची कमाई?

Ramayana Box Office Collection Day 14 : रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली आहे. जगभरात या चित्रपटाने १५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
Ramayana Box Office Collection Day 14
Ramayana CollectionAI PHOTO
Published On: 
Summary

'रामायण' चित्रपटाने प्रदर्शनाच्या १४ व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी

जगभरातील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने १५०० कोटींचा टप्पा पार

रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद

नितीश तिवारी यांचा 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise Of A Legend) हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपट रिलीज होऊन आता १४ दिवस पूर्ण झाले आहेत. 'रामायण' चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा पौराणिक महाकाव्यपट संपूर्ण भारतात (पॅन-इंडिया) एक मोठा यशस्वी चित्रपट ठरला असून, त्याने उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजारपेठांमधील प्रेक्षकांना आकर्षित केले असून बंपर कमाई केली आहे.

'रामायण' १४ व्या दिवसाची कमाई

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, १४ व्या दिवशी भारतात 'रामायण' चित्रपटाने अंदाजे २३.२० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. यामुळे भारतातील एकूण नेट कमाई ८४४.४० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सध्या भारतातील एकूण ग्रॉस कमाई ९८३.४४ कोटी रुपये इतकी आहे. दिवसेंदिवस आकड्यांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. 'रामायण' चित्रपटाने जगभरात १५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'रामायण' चित्रपटाने विशेषतः दक्षिण भारतातील बाजारपेठांमध्ये आपली छाप पाडली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये या चित्रपटाने प्रभावी कमाई केली आहे. 'रामायण'ने केरळमध्ये ५० कोटी रुपयांहून अधिक ग्रॉस कमाई केली आहे. असे करणारा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

'रामायण'चं १४ दिवसांचे कलेक्शन

  • दिवस १: ६४.८५ कोटी रुपये

  • दिवस २: ४८.०५ कोटी रुपये

  • दिवस ३: ६९.८० कोटी रुपये

  • दिवस ४: ५६.१५ कोटी रुपये

  • दिवस ५: १०७.५० कोटी रुपये

  • दिवस ६: ९४.१० कोटी रुपये

  • दिवस ७: ७०.६५ कोटी रुपये

  • दिवस ८: ५३.५० कोटी रुपये

  • दिवस ९: ४८.१० कोटी रुपये

  • दिवस १०: ७२.९० कोटी रुपये

  • दिवस ११: ७५ कोटी रुपये

  • दिवस १२: ३२ कोटी रुपये

  • दिवस १३: २८.३५ कोटी रुपये

  • दिवस १४: २३.२० कोटी रुपये

  • एकूण: ८४४.४० कोटी रुपये

Ramayana Box Office Collection Day 14
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चाहत्यांची तुफान गर्दी; जागा मिळेना म्हणून थेट झाडावर चढले, VIDEO व्हायरल

'रामायण' हा दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा भव्य पौराणिक चित्रपट असून, वाल्मिकी रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय रवी दुबे लक्ष्मण आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आहेत. नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, संगीताची सर्वत्र चर्चा होत आहे. प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यातील संघर्ष, सीतेचे अपहरण, रामाचा वनवास आणि सत्य-असत्यातील युद्ध अशा रामायणातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे भव्य सिनेमॅटिक चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.