Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चाहत्यांची तुफान गर्दी; जागा मिळेना म्हणून थेट झाडावर चढले, VIDEO व्हायरल

Gautami Patil Video Viral : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला चाहत्यांनी तुफान गर्दी केली. काही चाहत्यांनी चक्क झाडावर चढून गौतमी पाटीलच्या नृत्याचा आनंद घेतला. या अनोख्या प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
Gautami Patil Video Viral
Gautami PatilSAAM TV
Published On: 
Summary

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला चाहत्यांची मोठी गर्दी

काही चाहत्यांनी चक्क झाडावर चढून नृत्याचा आनंद घेतला.

गौतमी पाटीलच्या डान्सची चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली

महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तिच्या कार्यक्रमांना चाहत्यांची मोठी गर्दी जमते. अनेकदा तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासन् तास वाट पाहतात. असाच काहीसा उत्साह पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या ढोकसांगवी येथे पाहायला मिळाला. गौतमी पाटीलच्या नृत्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांनी एवढी मोठी गर्दी केली की, कार्यक्रमस्थळी जागाही अपुरी पडली. अखेर काही चाहत्यांनी थेट झाडावर चढून तिच्या नृत्याचा आनंद घेतला. या अनोख्या प्रकारामुळे कार्यक्रमाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

गौतमी पाटीलचा कार्यक्रम

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील, मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि ओम यादव उपस्थित होते. या कलाकारांना पाहण्यासाठी आणि त्यांचे सादरीकरण अनुभवण्यासाठी परिसरातील नागरिकांसह अनेक चाहत्यांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. विशेषतः गौतमी पाटीलच्या नृत्याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.

जागा अपुरी पडली, चाहते थेट झाडावर चढले

गौतमी पाटीलचे नृत्य सुरू असताना कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांची गर्दी वाढतच गेली. गर्दीमुळे अनेकांना कार्यक्रम व्यवस्थित पाहता येत नव्हता. मात्र, गौतमीचा डान्स पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता काही कमी झाली नाही. त्यामुळे काही प्रेक्षकांनी थेट झाडावर चढण्याचा मार्ग निवडला. झाडाच्या फांद्यांवर बसून हे चाहते गौतमी पाटीलच्या नृत्याचा आनंद घेताना दिसले. विशेष म्हणजे, खाली उभे राहून कार्यक्रम पाहण्यासाठी जागा मिळत नसतानाही चाहत्यांनी हार मानली नाही. झाडावर बसून त्यांनी गौतमीच्या प्रत्येक अदाकारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमातील हा अनोखा प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Gautami Patil Video Viral
Bigg Boss 20 च्या घरात कॅप्टन्सीसाठी हाय व्होल्टेज ड्रामा! 'या' स्पर्धकाने माही विजच्या हाताचा चावा घेतला |VIDEO

गौतमी पाटीलच्या नृत्याची लोकप्रियता केवळ शहरांपुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातही तिचे मोठे चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद याचीच साक्ष देतो. ढोकसांगवी येथील कार्यक्रमात चाहत्यांनी दाखवलेला उत्साह पाहता गौतमी पाटीलची तरुणाईमध्ये असलेली क्रेझ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. व्हायरल व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.