कॅप्टन्सी टास्कमध्ये जोरदार भांडणे
घरातील १० सदस्य या आठवड्यात नॉमिनेट
लव गिलवर माही विजच्या हाताचा चावा घेतल्याचा आरोप
'बिग बॉस २०' चा खेळ दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. नुकताच घरात या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. यात स्पर्धकांमध्ये प्रचंड लढाई पाहायला मिळाली. स्पर्धकांमध्ये नियमितपणे वाद आणि भांडणे होतात, पण यावेळी कॅप्टनसी टास्कदरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला. कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टास्कदरम्यान लव गिल आणि अभिनेत्री माही विज यांच्यातील वाद इतका वाढतो की, लवने माहीच्या हाताला चावा घेतल्याचा आरोप माही लव गिलवर लावते. खेळातील या घटनेची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. व्हिडीओवरून आणि सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांवरून असे दिसून येते की, वादादरम्यान लव गिलला आपला राग अनावर होतो आणि ती माही विजच्या हाताला चावा घेतला. तथापि, दोघांमध्ये हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला याचे संपूर्ण तपशील अद्याप अस्पष्ट आहेत.
'बिग बॉस २०' च्या घरातील स्पर्धकांना टास्क दरम्यान त्यांच्या शक्तीचा वापर करण्याची परवानगी आहे, परंतु जाणूनबुजून शारीरिक इजा पोहोचवणे नियमांच्या विरुद्ध मानले जाते. परिणामी, लव गिलवरील या आरोपामुळे आता बिग बॉस कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अद्याप लव गिलवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. येणारा 'वीकेंड का वार' खूपच मनोरंजक ठरणार आहे.
BBTakच्या रिपोर्टनुसार, उदिती सिंग 'बिग बॉस २०' घराची नवीन कॅप्टन बनली आहे. मात्र अद्याप बिग बॉसने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी १० सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात अरिशफा खान, माही वीज, कनिका मान, लव्ह गिल, मनीष गोयल, आम्रपाली दुबे, गुल्लू, स्काऊट ओपी, काझी तौकीर आणि युंग डीएसए यांचा समावेश आहे. या आठवड्यात कोण घराचा निरोप घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.