Manasvi Choudhary
आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये टिव्ही असतो. टिव्ही हा मनोरंजनाचा एक भाग आहे.
आपल्यापैकी काहींच्या हॉलमध्ये तर काहींच्या बेडरूममध्ये टिव्ही असतो परंतु तुम्हाला टिव्ही लावण्याची योग्य दिशा माहितीये का?
वास्तुशास्त्रात, घरामध्ये टिव्ही लावण्याची योग्य दिशा सांगितली आहे.
जर तुमच्या घरात मुले, तरुण किंवा विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी पूर्व दिशेला तोंड करून टीव्ही पाहणे किंवा या दिशेला टीव्ही लावणे सर्वात शुभ मानले जाते. या दिशेमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.
उत्तर ही संपत्तीचे देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल आणि घरात धन-समृद्धी वाढवायची असेल, तर उत्तर किंवा आग्नेय दिशेला टीव्ही ठेवणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
जर तुम्ही बेडरूममध्ये टीव्ही लावत असाल, तर एक महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक आहे. टीव्ही कधीही आरशासमोर ठेवू नका, जेणेकरून टीव्ही बंद असताना त्यात तुमचे प्रतिबिंब दिसणार नाही. वास्तूनुसार बेडरूममधील आरशात बेड किंवा मानवी शरीर दिसणे अशुभ मानले जाते.
घरामध्ये दक्षिण दिशेला टीव्ही ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. दक्षिण दिशा ही यमराजाची आणि नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. या दिशेला टीव्ही लावल्यास घरातील सदस्यांमध्ये मानसिक तणाव वाढू शकतो, कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतात आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.