Gold Loan Rules: गोल्ड लोन फेडल्यानंतरही सोने मिळाले नाही? बँकेने उशीर केल्यास द्यावे लागणार दररोज ५ हजार रुपये, वाचा नवे नियम

Gold Loan Rules: गोल्ड लोन फेडल्यानंतर बँकेला कामकाजाच्या ७ दिवसांत सोने परत करावे लागणार आहे. उशीर झाल्यास दररोज ५ हजार रुपये भरपाई मिळण्याचा RBI चा नियम जाणून घ्या.
Gold Loan Rules
Gold Loan RulesSaam TV
Published On: 

Gold Loan Rules: गोल्ड लोन घेण्यासाठी अनेक जण आपले सोन्याचे दागिने बँकेत किंवा फायनान्स कंपनीत गहाण ठेवतात. तुम्हीही गोल्ड लोन घेतले असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गोल्ड लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे नियम केले आहेत. या नियमानुसार, कर्जाचे पैसे पूर्ण भरल्यानंतर बँकेला ग्राहकाचे सोने परत करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, सोने परत देण्यास बँकेकडून उशीर झाल्यास ग्राहकाला दररोज ५ हजार रुपये भरपाई मिळू शकते.

गोल्ड लोन फेडल्यानंतर ७ दिवसांत सोने परत मिळणार

RBI च्या नियमानुसार, ग्राहकाने गोल्ड लोनचे सर्व पैसे भरल्यानंतर बँकेने त्याचे सोने त्याच दिवशी परत देण्याचा प्रयत्न करावा. काही कारणामुळे त्याच दिवशी सोने देणे शक्य नसेल, तर जास्तीत जास्त कामकाजाच्या ७ दिवसांत सोने परत करणे आवश्यक आहे. म्हणजेच, कर्जाचे पैसे भरल्यानंतर ग्राहकाला सोन्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही.

Gold Loan Rules
Curd Eating: रात्री जेवल्यानंतर दही खायला आवड? आरोग्यावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम; जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ

उशीर झाल्यास दररोज ५ हजार रुपये भरपाई

समजा, तुम्ही गोल्ड लोनचे सर्व पैसे भरले आहेत. तरीही बँकेने कामकाजाच्या ७ दिवसांत तुमचे सोने परत केले नाही, तर बँकेला प्रत्येक दिवसासाठी ५ हजार रुपये भरपाई द्यावी लागेल. उदाहरणार्थ, सोने परत देण्यास ३ दिवस उशीर झाला, तर तुम्हाला १५ हजार रुपये भरपाई मिळू शकते. मात्र, बँकेच्या चुकीमुळे उशीर झाला असेल, तरच हा नियम लागू होतो.

Gold Loan Rules
Bigg Boss 20: कॅप्टन होताच उदिती सिंहला मिळाली मोठी पॉवर; एका स्पर्धकाला मिळणार नॉमिनेशनपासून सुटका

सोने हरवले किंवा खराब झाले तर काय होणार?

गोल्ड लोन घेताना ग्राहक आपले दागिने बँकेत सुरक्षित ठेवण्यासाठी देतो. त्यामुळे त्या दागिन्यांची काळजी घेण्याची जबाबदारी बँकेची असते. बँकेकडून सोने हरवले किंवा चोरीला गेले, तर ग्राहकाला योग्य भरपाई द्यावी लागते. तसेच दागिन्यांचे वजन कमी झाले किंवा ते खराब झाले, तरी बँकेला त्याची जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, अशा प्रकरणात दररोज ५ हजार रुपये भरपाई मिळत नाही.

सोने परत घेताना या गोष्टी तपासा

गोल्ड लोनचे पैसे भरल्यानंतर बँकेत जाताना पैसे भरल्याची पावती आणि सोने गहाण ठेवल्याचे कागद सोबत ठेवा. सोने परत मिळाल्यानंतर त्याचे वजन आणि शुद्धता तपासा. तसेच गहाण ठेवताना दिलेले दागिनेच परत मिळाले आहेत ना, याची खात्री करा.

बँकेने सोने परत न केल्यास तक्रार कुठे करावी?

कर्जाचे सर्व पैसे भरूनही बँक सोने परत देत नसेल, तर सर्वप्रथम बँकेच्या तक्रार विभागात लेखी तक्रार करा. तक्रार करूनही ३० दिवसांत उत्तर मिळाले नाही किंवा तुमची समस्या सुटली नाही, तर RBI च्या CMS पोर्टलवर तक्रार करू शकता. त्यामुळे गोल्ड लोन घेताना आणि सोने परत घेताना सर्व कागदपत्रे जपून ठेवणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.