Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधव आठ वर्षांनंतर करणार रंगमंचावर एन्ट्री; 'ॲनिमल' नाटकात साकारणार दुहेरी भूमिका

Siddharth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधव आठ वर्षांनंतर ‘ॲनिमल’ या नाटकातून रंगमंचावर पुनरागमन करत आहेत. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित या नाटकात ते दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत.
Siddharth Jadhav
Siddharth JadhavSaam tv
Published On

Siddharth Jadhav: मराठी रंगभूमीवर नव्या नाटकांमध्ये नवे प्रयोग होत आहेत. प्रेक्षक नाटकांना अधिक पसंती देत आहेत. अनेक नविन नाटक लवकरच रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहेत. यामध्येच मराठी चित्रपटसृष्टीत आणि विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव आता पुन्हा एकदा रंगमंचावर झळकणार आहेत. जवळपास आठ वर्षांनंतर 'ॲनिमल' या नव्या नाटकातून प्रेक्षकांसमोर येत आहेत.

ॲनिमल’ हे नाटक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी लिहिलं आणि दिग्दर्शित केलं आहे. या नाटकात सिद्धार्थ जाधव दुहेरी भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे या नाटकाची निर्मितीही त्याने स्वतः केली असून त्याच्या ‘ताराराम’ या निर्मिती संस्थेची ही पहिली रंगभूमीवरील कलाकृती आहे. आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्याने ही निर्मिती संस्था सुरू केली असून "ॲनिमल'मधून तिच्या निर्मिती संस्थेच्या प्रवासाची सुरुवात होत आहे.

Siddharth Jadhav
Battle Of Galwan New Title: 'बॅटल ऑफ गलवान'चं नाव बदललं; सलमान खानचा चित्रपट आता 'या' नावाने होणार प्रदर्शित

या नाटकाची कथा दत्तू नावाच्या तरुणाभोवती फिरते. छोट्या गावातून मोठी स्वप्नं घेऊन मुंबईत आलेला दत्तू अभिनेता होण्याची इच्छा बाळगतो. मात्र महानगरातील स्पर्धा, अस्थिर आयुष्य, नात्यांमधील ताण आणि मानसिक संघर्ष यांचा त्याच्या आयुष्यावर खोल परिणाम होतो. या सर्व अनुभवांतून त्याचा प्रवास अधिक गुंतागुंतीचा बनतो. एका व्यक्तीच्या मनात सुरू असलेली ही झुंज रंगमंचावर एकपात्री शैलीत सादर केली जाणार आहे. यामुळे प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळणार आहे.

Siddharth Jadhav
Jannat Zubair Attack: प्रसिद्ध अभिनेत्री आणि भावावर पनवेलमध्ये हल्ला? सोशल मीडियावरील ती पोस्ट व्हायरल

सिद्धार्थ जाधव याच्यासाठीही हा प्रयोग खास आहे. रंगभूमीबद्दल बोलताना तो म्हणाला की, प्रत्येक प्रयोग त्याच्यासाठी नवा अनुभव असतो. कलाकार म्हणून स्वतःला पुन्हा तपासून पाहण्याची ही संधी असते. वेगवेगळ्या शहरांतील प्रेक्षकांसमोर सलग प्रयोग सादर करणे ही एक वेगळीच एनर्जी देणारी गोष्ट असल्याचंही त्याने नमूद केलं.

सध्या या नाटकाच्या तालमी जोरात सुरू आहेत. लवकरच ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. त्यानंतर बोरीवली, वाशी, दादर, पार्ले आणि मुलुंड अशा विविध ठिकाणी ‘ॲनिमल’चे प्रयोग रंगणार आहेत. महेश मांजरेकर यांनी या नाटकाला संगीत दिल्यामुळे आणि सिद्धार्थ जाधवच्या दमदार अभिनयामुळे 'ॲनिमल'ची रंगभूमीवरील ही प्रयोगमालिका प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com