Jannat Zubair Attack: प्रसिद्ध अभिनेत्री आणि भावावर पनवेलमध्ये हल्ला? सोशल मीडियावरील ती पोस्ट व्हायरल

Jannat Zubair Attack in Panvel: टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबैर आणि तिचा भाऊ अयान झुबैर यांच्यावर पनवेलमध्ये कथित हल्ला झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
Jannat Zubair Attack
Jannat Zubair AttackSaam tv
Published On

Jannat Zubair Attack: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जन्नत झुबैर नेहमीच तिच्या कामामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. जन्नत झुबैर लाफ्टर शेफ्स 3 मध्ये मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून आणि प्रेक्षकांकडून कौतूक झाले. पण आता जन्नतबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे. जन्नत आणि तिचा भाऊ अयान झुबैर यांच्यावर पनवेलमध्ये हल्ला झाल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी जन्नत झुबैर आणि तिचा भाऊ अयान हे पनवेलमध्ये गेले होते. त्याच दरम्यान दोघांवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती सोशल मीडियावर समोर आली. या हल्ल्यात दोघांनाही किरकोळ दुखापत झाल्याचा दावा काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र या घटनेबाबत नेमके काय घडले, हल्ला कोणी आणि का केला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Jannat Zubair Attack
Shreya Ghoshal: अरिजीत सिंगनंतर श्रेया घोषालही म्युझिकमधून ब्रेक घेणार? म्हणली, 'मी त्या दिवशी गाणं सोडेन, ज्या दिवशी...'

ही माहिती व्हायरल वूमनिया या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली होती. त्यानंतर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. १४ मार्चपासून ही बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरू लागली. त्यामुळे जन्नत झुबैरच्या चाहते चिंतेचं आहेत.

Jannat Zubair Attack
Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा थोडक्यात वाचली, देसी गर्लसोबत ऑस्करसोहळ्याआधी काय घडलं?

दरम्यान, या हल्ल्याबाबत जन्नत झुबैर, तिचं कुटुंब किंवा स्थानिक पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ही घटना खरचं घडली आहे की सोशल मीडियावरील अफवा आहे, याबाबत प्रश्न कायम आहे. जन्नत झुबैर ही टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि नंतर अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम करून ओळख निर्माण केली. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com