Shreya Ghoshal: अरिजीत सिंगनंतर श्रेया घोषालही म्युझिकमधून ब्रेक घेणार? म्हणली, 'मी त्या दिवशी गाणं सोडेन, ज्या दिवशी...'

Shreya Ghoshal: श्रेया घोषाल ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय गायिका आहे. तिच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. आता, श्रेया घोषालने नुकतीच अशी एक गोष्ट सांगितली आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धकका बसला आहे.
Shreya Ghoshal
Shreya Ghoshal Saam Tv
Published On
Summary

रिटायरमेंटबद्दल श्रेया घोषालचं मोठं विधान

श्रेयाला 'लिप-सिंकिंग' आवडत नाही

त्या दिवशी मी गाणे सोडून देईन

अरिजीतच्या निर्णयाचा आदर आहे

Shreya Ghoshal: अरिजित सिंगने अवघ्या काही दिवसांपूर्वीच प्लेबॅक सिंगिंगमधून रिटायरमेंट जाहीर केली. अरिजितची ही रिटायरमेंट केवळ त्याच्या चाहत्यांसाठीच नव्हे, तर अनेक कलाकारांसाठी एक मोठा धक्का होता. आता श्रेया घोषालनेही एक असेच विधान केले आहे. यामुळे तिच्या चाहत्यांच्या मनात नक्कीच भिती निर्माण झाली आहे.

श्रेयाला 'लिप-सिंकिंग' आवडत नाही

'एबीपी न्यूज'शी बोलताना श्रेयाने सांगितले की, प्रत्यक्ष मंचावर सादरीकरण करणे हा खरोखरच एक उत्तम अनुभव असतो. याउलट, मंचावर असताना 'लिप-सिंकिंग' (केवळ ओठ हलवून गाण्याचा अभिनय करणे) करणे मला कधीही जमणार नाही आणि मला कधीचं आवडत नाही.

Shreya Ghoshal
Dhurandhar 2: 'धुरंधर २'चा जलवा; रिलीजपूर्वीच रणवीर सिंगच्या चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

त्या दिवशी मी गाणे सोडून देईन...

ती पुढे म्हणाली, "मला 'लिप-सिंकिंग' अत्यंत चुकीचे वाटते. ज्या दिवशी मला 'लिप-सिंकिंग' करण्यास भाग पाडले जाईल, त्याच दिवशी मी गाणे सोडून देईन." तिने पुढे सांगितले की, जोपर्यंत तिला तिच्या आवाजाची साथ आहे, तोपर्यंत ती आपल्या गायनाची रियाज सुरूच ठेवेल. पण तोपर्यंत प्रेक्षकांसाठी नेहमीच लाईव्ह परफॉर्मन्स करत राहिनं असे ती म्हणाली.

Shreya Ghoshal
Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा थोडक्यात वाचली, देसी गर्लसोबत ऑस्करसोहळ्याआधी काय घडलं?

अरिजीतच्या निर्णयाचा आदर आहे

अरिजीतबद्दल पुढे बोलताना श्रेया म्हणाली, "तो मनापासून एक सच्चा संगीतकार आहे. संगीतापासून आपल्याला काय मिळेल, याचा विचार तो कधीच करत नाही; त्याला ज्या गोष्टींत आनंद मिळतो तो तेच करतो. त्याच्यासाठी संगीत सर्वाच श्रेष्ठ आहे. मी त्याच्या निर्णयाचा आदर करते. मी सुद्धा कधीकधी कामातून थोडा ब्रेक घेण्याचा विचार करते. त्याने हा निर्णय अत्यंत धैर्याने घेतला आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com