ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूड क्वीन आहे.
ऐश्वर्या रायने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.
'धुरंधर' स्टारने ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे कौतुक केले होते.
'धुरंधर' नंतर अक्षय खन्नाला खूप प्रसिद्धी मिळाली. अक्षय खन्ना या चित्रपटात 'रहमान डकैत'च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याने बॉक्स ऑफिस गाजवले. अक्षय खन्नाच्या अभिनयावरून कोणाची नजर हटली नाही. अक्षय खन्नाने आजवर अनेक मोठ्या कालाकारांसोबत काम केले आहे. अक्षय खन्नाचा एक किस्सा जाणून घेऊयात.
TOI च्या वृत्तानुसार, बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिच्याकडे अक्षय खन्ना एकटक पाहतच राहतो. ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून बी-टाउनची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन आहे. अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या रायने 'ताल' चित्रपटात एकत्र काम केले. अक्षय खन्ना, सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबत आपल्या 'इत्तेफाक' या चित्रपटाचे प्रमोशन करत होता. चित्रपटाची टीम करण जोहरशी संवाद साधत होती; त्यावेळी करणने अक्षयला विचारले की, या क्षेत्रात त्याला सर्वात सुंदर (stunning) कोण वाटते? अक्षय खन्नाने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, "ॲश (ऐश्वर्या राय)," आणि त्यानंतर त्याने त्या अभिनेत्रीचे भरभरून कौतुक केले.
अक्षय खन्ना म्हणाला की, "'जोधा अकबर'ची ही स्टार जेव्हा जेव्हा मला भेटते, तेव्हा तेव्हा मी तिच्यावरून माझी नजर हटवूच शकत नाही..." अभिनेत्याने सांगितल्यानुसार, इतर कोणाचाही अक्षयवर असा प्रभाव पडत नाही; पण जेव्हा ऐश्वर्याचा विषय येतो, तेव्हा मात्र तो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. त्याने सांगितले की, "पुरुषांसाठी ही गोष्ट थोडी लाजिरवाणी असते. तिला कदाचित याची सवय झाली असेल (की लोक तिच्याकडे एकटक पाहतात). पण मला मात्र, एखाद्या व्यक्तीवरून नजरच हटवता न येण्याची सवय नाही... मी तिच्याकडे एखाद्या वेड्यासारखे एकटक पाहतच राहतो..."
ऐश्वर्या रायचे कौतुक करत सोनाक्षी सिन्हा म्हणाली, "केवळ पुरुषच नाही, तर मलाही तिच्यावरून माझी नजर हटवता येत नाही. "ती खरोखरच अत्यंत सुंदर आहे. " ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात मोलाचे स्थान निर्माण केले आहे.
अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ऋषी कपूर यांचा 'आ अब लौट चलें' आणि सुभाष घई यांचा 'ताल' या चित्रपटात दोघे एकत्र दिसले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.