'धुरंधर' नंतर रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आदित्य धरने खास पोस्ट शेअर करून 'धुरंधर' च्या खऱ्या हिरोची ओळख जगाला करून दिली आहे.
'धुरंधर' ने बॉक्स ऑफिसवर १,००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
'धुरंधर' आणि 'धुरंधर २' च्या रिलीजनंतर सर्वत्र रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांचे कौतुक होताना दिसत आहे. सर्वजण त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. मात्र आदित्य धरने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करून 'धुरंधर' चा खरा आत्मा, खरा हिरो कोण, याचा खुलासा केला आहे. आदित्य धरने सिनेमॅटोग्राफर विकास नौलखा याला 'धुरंधर' चा आत्मा ( Soul Behind Dhurandhar) म्हटले आहे. आदित्य धरने विकास नौलखासोबतचे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो शेअर करून त्याचे भरभरून कौतुक केले आहे.
"धुरंधरमागील डोळा, हृदय आणि आत्मा म्हणजे विकास नौलखा चित्रपटाची कथी वाचल्यानंतर ते काय म्हणाले, अशा प्रकारचा चित्रपट करण्यासाठी मी ३० वर्षे वाट पाहिली आहे. मी यासाठी माझा जीव देईन. त्याने प्रत्येक शब्द खरे करून दाखवले. त्यानंतर जे घडले ते केवळ काम नव्हते, तर ती एक निष्ठा होती.चित्रपटाचे ओझे अक्षरशः आपल्या खांद्यावर घेऊन, अमृतसरच्या भाजून काढणाऱ्या उन्हातून आणि लेहच्या कडाक्याच्या थंडीतून मार्ग काढत, त्याने आपली संकल्पना एकदाही डगमगू दिली नाही.
विकासची बारकाव्यांकडे पाहण्याची नजर, कॅमेऱ्यामागील त्याची भावनिक बुद्धिमत्ता, एखादे दृश्य केवळ कसे दिसते हेच नव्हे, तर ते कसे जाणवते हे समजून घेण्याची त्याची क्षमता, यातच त्याची प्रतिभा दडलेली आहे. 'धुरंधर'मधील प्रत्येक फ्रेम जिवंत आहे, कारण त्याने तसे होऊ दिले. त्याने केवळ क्षण टिपले नाहीत, तर त्यांना जीवन दिले.सेटवर त्याच्या सूचना कधीही कर्कश नसत, पण नेहमीच अचूक असत. अनेकजण चित्रपट बनवतात. विकासने हा चित्रपट जगलाय."
'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'धुरंधर' मध्ये रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले.'धुरंधर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८ दिवसात १,००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाचे जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १,६०५.७५ कोटी रुपये कमावले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.