Munawar Faruqui Apology video : 'कोकणावर खूप प्रेम आणि...'; वादग्रस्त वक्तव्यानंतर मुनव्वर फारुकीची माफी, नेमकं काय म्हणाला?

Munawar Faruqui Apology to konkani people : 'कोकणावर खूप खूप प्रेम आणि माझी माफी, असं कॅप्शन देत मुनव्वरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
'कोकणावर खूप प्रेम आणि...';  वादग्रस्त वक्तव्यानंतर मुनव्वर फारुकीची माफी, नेमकं काय म्हणाला?
Munawar Faruqui Apology :Saam tv
Published On

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा वादात अडकला आहे. मुनव्वर फारुकीने एका कार्यक्रमात कोकणी लोकांवर केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यातील कोकणात राहणाऱ्या लोकांच्या वर्णणावरून केलेल्या टिप्पणीवरून वाद निर्माण झाला आहे. मुनव्वरच्या वक्तव्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कोकणी लोकांबाबत अशब्द वापरल्यानंतर राजकीय लोकांनी मुनव्वरला मोठा इशारा दिला आहे. यानंतर आता मुनव्वरने माफी मागितली आहे.

मुनव्वर नेमकं काय म्हणाला?

मुनव्वर मुंबईत एक स्टँडअप कॉमेडी शो होता. या शोसाठी सर्व जण मुंबईच्या बाहेरून आले आहेत का? कोणी लांब राहतं का? कोणी लांबचा प्रवास केलाय का? कोणी लांबून प्रवास करून कार्यक्रमाला आलं आहे का? असे सवाल मुनव्वरने उपस्थितांना केले. त्यानंतर प्रेक्षकांमधील एकाने मी तळोजा, मुंबईबाहेरून आल्याचे सांगितलं. त्यानंतर मुन्नावर म्हणाला, 'हे लोक प्रवास करून आल्याचे सांगतात. यांचे गाववाले लोक यांना विचारता, कुठे राहता? त्यावेळी हे लोक सांगतात. मुंबईत राहत असल्याचे सांगतात. हे कोकणी लोक सगळ्यांना च... बनवतात, असं त्याने म्हटलं होतं.

'कोकणावर खूप प्रेम आणि...';  वादग्रस्त वक्तव्यानंतर मुनव्वर फारुकीची माफी, नेमकं काय म्हणाला?
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी बरळला, कोकणी माणसांबाबत वादग्रस्त विधान, VIDEO होतोय व्हायरल

मुनव्वर नेमकं काय म्हणाला?

मुनव्वर फारुकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनसे कार्यकर्त्याने मुनव्वरचा व्हिडिओ पोस्ट करत कारवाईची मागणी केली आहे. तर भाजप आमदार नितेश राणे यांनीही धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. या सर्व प्रकारानंतर मुनव्वर फारुकीने या प्रकरणावर माफी मागितली आहे.

मुनव्वर माफी मागताना नेमकं काय म्हणाला?

'काही दिवसांपूर्वी एक शो झाला. तेथील प्रेक्षकांसोबत मी बोलत होता. बोलताना अचानक कोकणाचा विषय निघाला. तळोजा भागात अनेक कोकणी लाक राहत असल्याचं माहीत होतं. तेथे माझे अनेक मित्र आहेत. त्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढले जात आहेत, असे त्याने म्हटलं.

'कोकणावर खूप प्रेम आणि...';  वादग्रस्त वक्तव्यानंतर मुनव्वर फारुकीची माफी, नेमकं काय म्हणाला?
Big Boss Marathi 5: तुझा लाजरान, साजरा मुखडा कसं खुलला गं; बिग बॉस मराठीमधील युरोपियन परीचा मराठमोळा साजशृंगार

'आता लोकांना मी कोकणाची थट्टा केल्याचं वाटत आहे. मात्र, तसं काही नाही. माझा थट्टा करण्याचा हेतू अजिबात नव्हता. माझ्या बोलण्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. स्टँडअप कॉमेडियन म्हणून मला कोणीही दु:खी होऊ नये असं वाटतं. मी सर्वांची मनापासून माफी मागतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, असं मुनव्वर फारुकीने म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com