स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी बरळला, कोकणी माणसांबाबत वादग्रस्त विधान, VIDEO होतोय व्हायरल

Munawar Faruqui : स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात मुनव्वर फारुकी उपस्थितांना टोमणे मारून मनोरंजन करत असतो. त्यामधून अनेकदा वाद झालाय.
Munawar Faruqui
Munawar FaruquiSaam Tv
Published On

Munawar Faruqui marathi : स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. स्टँडअप कॉमेडी करत असताना त्याने अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागलाय. आता त्याचा आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलेय. त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे, त्याशिवाय मनसे कार्यकर्त्यांकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात मुनव्वर फारुकीने कोकणी माणसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेय. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही. या व्हिडीओची पडताळणी झालेली नाही.

स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात मुनव्वर फारुकी उपस्थितांना टोमणे मारून मनोरंजन करत असतो. त्यामधून अनेकदा वाद झालाय. आता कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्याने वाद ओढावला आहे. सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

पाहा व्हायरल व्हिडिओ -

मुनव्वर फारुकीने स्टँडअप कॉमेडी शोमध्ये उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना विचारलं की “तुम्ही सर्वजण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातूनच आलेले आहात का? तुमच्यापैकी कोणी लांब राहतं का? कोणी लांबचा प्रवास करून इथे आलंय का?” त्यावर प्रेक्षकांमधून कोणीतरी हो असे उत्तर दिलं.

त्यावर फारुकीने विचारलं, “कुठून आलात?” त्यावर समोरून उत्तर आलं, “तळोजा, मुंबईबाहेरून आलोय”. यावर फारुकी म्हणाला, “हे लोक आज सांगतायत की प्रवास करून आलोय, अन्यथा यांचे गाववाले लोक यांना विचारतात, कुठे राहता? तेव्हा हेच लोक त्यांच्या गाववाल्यांना सांगतात, मुंबईत राहतो. हे कोकणी लोक सगळ्यांना च** बनवतात.” फारुकी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तळोजावरून आलेल्या प्रेक्षकांना विचारलं, “तुम्ही कोकणी आहात का?” त्यावर समोरून होकारार्थी उत्तर मिळाल्यावर तो जोरजोराने हसू लागला.

मनसेकडून प्रतिक्रिया ...

मुनाव्वर फारुकीचा बंदोबस्त कऱणार असल्याची प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली आहे. मनसे कामगार नेते राज पारटे म्हणाले की, मनसेकडून मराठी माणसांना आवाहन आहे, मुनावर फारुखी कुठे असेल याविषयी मनसैनिकांना कळवा. त्याचा बंदोबस्त करूयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com