Cockroach Janata Party : सिनेसृष्टीत 'कॉकरोच' सुपरहिट; बॉलिवूड ते साऊथ फुल्ल सपोर्ट, फॉलोअर्संच्या यादीत बड्या सेलिब्रिटींची नावं

Celebrity Support CJP Protest : 'कॉकरोच जनता पार्टी' चे मोठे आंदोलन दिल्लीत होत आहे. याला सेलिब्रिटींकडूनही फुल्ल पाठिंबा मिळताना दिसत आहे. कलाकारांच्या यादीत कोणाची नावे पाहूया.
Celebrity Support CJP Protest
Cockroach Janata PartySAAM TV
Published On
Summary

'कॉकरोच जनता पार्टी' चे आंदोलन दिल्लीत होत आहे

तरुणाईमध्ये 'कॉकरोच जनता पार्टी' ची तुफान क्रेझ

बॉलिवूड, मराठी आणि साऊथ सेलिब्रिटींचाही फुल्ल सपोर्ट

सध्या जगभरात 'कॉकरोच जनता पार्टी' चा डंका पाहायला मिळत आहे. आज (६ जून) ला सीजेपीचे पहिले मोठे आंदोलन दिल्लीतील होत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन होत आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके भारतात येणार आहे.

'कॉकरोच जनता पार्टी'ला सेलिब्रिटींचा फुल्ल सपोर्ट

'कॉकरोच जनता पार्टी'ला मनोरंजन विश्वातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी 'कॉकरोच जनता पार्टी'ला सोशल मीडियावर फॉलो केले आहे. काहींनी 'कॉकरोच जनता पार्टी' ला पाठिंबा देताना सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या आहेत. मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी आणि हेमंत ढोमे देखील 'कॉकरोच जनता पार्टी'ला सपोर्ट करताना दिसत आहेत.

बॉलिवूड कलाकार

बॉलिवूड कलाकारांच्या यादीत दिया मिर्झा, फातिमा सना, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, विजय वर्मा, उर्फी जावेद, गायक विशाल ददलानी , कोंकणा सेन शर्मा, ईशा गुप्ता, हिमांशी खुराना, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा, साउथ स्टार प्रकाश राज, 'बिग बॉस' फेम उमर रियाझ, अभिषेक निगम, नगमा मिराजकर, शीझान खान यांनी पाठिंबा दिला आहे.

कॉकरोच जनता पार्टी

सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी' उदयास आली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली होती. परीक्षांसंबंधित वादांनंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आज आंदोलन करण्यात येत आहे. सोशल मीडिया आणि तरुणाईमध्ये 'कॉकरोच जनता पार्टी' ची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे.

Celebrity Support CJP Protest
Deool Band 2 Collection : स्वामी भक्तांनी थिएटर हाऊसफुल्ल; 'देऊळ बंद २'ची विक्रमी घोडदौड कायम, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची छप्परफाड कमाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com