Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

Shah Rukh Khan Announce Entry into Cockroach Janata Party : शाहरुख खान ‘कॉकरोच जनता पार्टी’ त सामील होणार आहे. या दाव्याची आणि प्रसारित होत असलेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहूया.
Shah Rukh Khan Announce Entry into Cockroach Janata Party :
Fact Check: Did Shah Rukh Khan Announce Joining ‘cockroach Janata Party’? Truth Behind Viral Videosaam tv
Published On

ऐकलंत, शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टी जॉईन करणार आहे, होय, हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. स्वत: शाहरूखने घोषणा केलीय. पण, खरंच शाहरुख खान कॉक्रोच जनता पार्टी जॉईन करणार आहे का? व्हायरल होत असलेला व्हिडिओ शाहरुख खानचाच आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली.

सध्या देशात कॉकरोच जनता पार्टीची हवा आहे, त्यातच आता अभिनेता शाहरुख खानचा कॉक्रोच जनता पार्टी जॉईन करणार असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, शाहरूखचे चाहतेही सोशल मीडियावर चर्चा करतायत. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनेही याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

Shah Rukh Khan Announce Entry into Cockroach Janata Party :
मोठी बातमी! 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक दीपकेंना ठार मारण्याच्या धमक्या

याबाबत अधिकृत माहिती शाहरुखच्या सोशल मीडियावर हँडलवर मिळू शकते.त्यामुळे आमच्या टीमने शाहरूखचे सोशल मीडिया अकाऊंट तपासून पाहिले. मात्र, शाहरुख कॉक्रोच जनता पार्टी जॉईन करणार असल्याचा व्हिडिओ कुठेही सापडला नाही. मग हा व्हिडिओ कधीचा आहे? कुणी बनवलाय? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Shah Rukh Khan Announce Entry into Cockroach Janata Party :
Cockroach Janata Party चं ६ जूनला पहिलं आंदोलन, मोदी सरकारला धारेवर धरणार; कशी असणार आंदोलनाची दिशा?

व्हायरल सत्य /साम इन्व्हिस्टिगेशन

शाहरुखने कॉकरोच जनता पार्टी जॉईन केलेली नाही

व्हायरल व्हिडिओ 10 सप्टेंबर 2023 चा आहे

'जवान' चित्रपटाच्या म्युझिक लाँच इव्हेंटमधील व्हिडिओ

शाहरुख खानचा ऑडिओ AI निर्मित

शाहरुख खानचा हा व्हिडिओ 'जवान' चित्रपटाच्या म्युझिक रिलीज कार्यक्रमातील आहे. व्हिडिओमध्ये कुठेही 'कॉक्रोच जनता पार्टी'चा उल्लेख नाही. 'कॉक्रोच जनता पार्टी' हा ऑनलाइन ट्रेंड मे 2026 मध्ये सुरू झाला.आणि हा व्हायरल व्हिडिओ अंदाजे तीन वर्षे जुना आहे.आम्ही 'रिझेम्बल एआय' या एआय डिटेक्शन टूलने व्हायरल व्हिडिओ स्कॅन केला.त्यावेळी शाहरुखच्या व्हिडिओतील आवाज बनावट असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आमच्या पडताळणीत शाहरुख कॉक्रोच जनता पार्टी जॉईन करणार असल्याचा दावा असत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com