‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना धमक्या.
दीपके यांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर केले.
कुटुंबालाही धमक्या दिल्याचा गंभीर आरोप.
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अभिजीत दीपके यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचे अनेक स्क्रीनशॉट्स शेअर करत या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबालाही धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.अभिजीत यांनी त्यांच्या 'एक्स' अकाऊंटवर एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यामध्ये एक तरुण त्यांना जाहीर धमकी देताना दिसत आहे. (Cockroach Janata Party Founder Abhijeet Deepke Receives Death Threats)
या प्रकारानंतर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मध्य प्रदेशचे राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी अभिजीत दीपके यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याच्या मागणी केली आहे. दीपके यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण त्यांना थेट इशारा देताना म्हणतो आहे की, "सीजेपीमुळे काहीही होणार नाही. ज्याप्रमाणे स्वयंपाकघरात रात्रीच्या वेळी झुरळे (कॉकरोड) पायाखाली चिरडली जातात, त्याचप्रमाणे तुझी ही झुरळेही चिरडली जातील."
अभिजीत दीपके यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांचं इन्स्टाग्राम खातं हॅक झाल्याची माहिती दिली आहे. यासह बॅकअप म्हणून कॉकरोच जनता पार्टीचं काढलेलं खातं हटवण्यात आल्याची माहिती देखील दीपके यांनी शेअर केली आहे. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान देशातील युवकांचा परजिवी आणि झुरळ असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. पण अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टी नावाचं अकाऊंट सुरू केलं होतं.
भारतात आलो तर आपल्याला दिल्ली पोलीस अटक करेल अशी भीतीही अभिजीत दीपके यांनी वर्तवली होती. कॉकरोच जनता पक्षाचे 'X' अकाउंट भारतात निलंबित केल्यानंतर अभिजीत दीपके यांनी आपल्या 'X' अकाउंटवर दिसणाऱ्या पॉप-अपचा फोटो शेअर करताना अटक होईल असं म्हटलं होतं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, ", कॉकरोज जनता पक्षाचे खाते भारतात निलंबित करण्यात आले आहे." "मला असे वाटते की, दिल्ली विमानतळावर उतरल्या उतरल्या दिल्ली पोलिसांचा ताफा मला तिहार तुरुंगात घेऊन जाईल."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.