Fitness Influencer Death: फिटनेस इन्फ्लुएंसरचे वयाच्या 22 व्या वर्षी निधन; चाहत्यांना बसला मोठा धक्का

Fitness Influencer Death: 500 किलो लेग प्रेसमुळे प्रसिद्ध झालेला ब्राझिलियन फिटनेस इन्फ्लुएंसर गॅब्रिएल गॅनली याचे वयाच्या 22 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे फिटनेस विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Fitness Influencer Death
Fitness Influencer DeathSaam Tv
Published On

Fitness Influencer Death: ब्राझिलमधील प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि फिटनेस इन्फ्लुएंसर गॅब्रिएल गॅनली याचे अवघ्या 22 व्या वर्षी निधन झाले आहे. सोशल मीडियावर “Bbzinho” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गॅब्रिएलच्या अकाली निधनामुळे जागतिक फिटनेस विश्वात शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाची माहिती त्याचा प्रायोजक ब्रँड Integralmédica यांनी अधिकृतपणे दिली.

गॅब्रिएल गॅनली हा आपल्या जबरदस्त फिटनेस, दमदार शरीरयष्टी आणि सोशल मीडियावरील प्रेरणादायी व्हिडिओंमुळे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. विशेषतः त्याने केलेल्या 500 किलो वजनाच्या लेग प्रेसचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या एका व्हिडिओमुळे त्याला जागभरात प्रसिद्धी मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅब्रिएलचा जन्मरिओ डी जनेरियो येथे झाला होता. केवळ 15 व्या वर्षी त्याने जिममध्ये प्रशिक्षण सुरू केले. सुरुवातीला त्याला मार्शल आर्ट्सची आवड होती. मात्र नंतर त्याने पूर्णपणे बॉडीबिल्डिंगकडे लक्ष केंद्रित केले. सातत्यपूर्ण मेहनत, सोशल मीडिया कंटेंट आणि फिटनेसबद्दलची आवड यामुळे तो कमी वयातच फिटनेस इंडस्ट्रीतील मोठं नाव बनला.

Fitness Influencer Death
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेविश्वात शोककळा

त्याच्या निधनाचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये ‘हायपोग्लायसेमिया’मुळे त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे; मात्र कुटुंबीय किंवा प्रायोजकांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Fitness Influencer Death
Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; डिमेन्शिया आजाराशी झुंज ठरली अपयशी, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

गॅब्रिएलच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि फिटनेस क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी श्रद्धांजली वाहिली आहे. इंस्टाग्रामवर गॅब्रिएलचे जवळपास 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्याचे वर्कआउट व्हिडिओ, फिटनेस टिप्स आणि मोटिवेशनल कंटेंट तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होते. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे फिटनेस क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com