Fighter Teaser: 'फायटर'चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज, हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या लव्ह केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

Fighter Teaser Out : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजेच २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी आज या चित्रपटाचा रोमांचक आणि धमाकेदार टीझर रिलीज केला.
Fighter Teaser
Fighter Teasersaam Tv
Published On

Fighter Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'फायटर'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत दोघांचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजेच २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी आज या चित्रपटाचा रोमांचक आणि धमाकेदार टीझर रिलीज (Fighter Teaser Out) केला. टीझर पाहून हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर असणार असल्याचे दिसत आहे. टीझरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या लव्ह केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फायटर चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त अनिल कपूरही जबरदस्त स्टाईलमध्ये दिसणार आहेत. नुकताच रिलीज झालेल्या टीझरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण एअरफोर्स ऑफिसर म्हणून आकाशात फायटर प्लेनसह जबरदस्त स्टंट करताना दिसत आहेत. या टीझरमध्ये अनिल कपूरही एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचा हा टीझर देशभक्तीच्या भावनेने भरलेला आहे. जे पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

या चित्रपटाच्या रोमांचक टीझरला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. अल्पावधितच या टीझरला जबरदस्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा टीझर पाहून प्रेक्षक चित्रपटाची आता आतुरतेने वाट पाहत आहेत. या टीझरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या चित्रपटाची सुरुवात 2024 मध्ये बिग-बँगने होईल. फायटर चित्रपटाची रंजक गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना दोन्ही स्टार्सची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे.

Fighter Teaser
तुला स्पेशल वाटावे यासाठी...., लग्नाच्या वाढदिवसानिमित्त Pravin Tarade ला पत्नीनं दिलं खास सरप्राईज, रोमँटिक VIDEO पाहिलात का?

दरम्यान, दीपिका पदुकोणने या आधी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' या चित्रपटात काम केले. आता त्यांच्याच फायटरमध्ये देखील ती दिसणार आहे. दिसली होती.हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर हा चित्रपट एक वॉर ड्रामा चित्रपट आहे. ज्यामध्ये निर्माते जबरदस्त एरियल अ‍ॅक्शन दाखवणार आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा हा पुढचा बिग बजेट सिनेमा आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी जवळपास 250 कोटी रुपये खर्च केले. आता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर किती कमाई करेल हे येत्या काही दिवसात कळेल.

Fighter Teaser
Rajinikanth यांना बसला चेन्नईतील पूराचा फटका, पोएस गार्डन येथील घरामध्ये शिरलं पाणी; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com