Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने वाढदिवशी कापला २४ कॅरेट सोन्याचा केक, फोटो पाहून नेटकरी झाले चकीत

Urvashi Rautela Cut 24 Karat Gold Cake: आपल्या करिअरसोबतच उर्वशी रौतेला तिच्या लक्झरी लाइफस्टाईलमुळे चर्चेत असते. सध्या ती पुन्हा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे उर्वशीने आपल्या वाढदिवशी सोन्याचा केक कापला. खास अंदाजमध्ये उर्वशीने आपला ३० वा वाढदिवस साजरा केला आहे.
Urvashi Rautela
Urvashi RautelaSaam Tv
Published On

Urvashi Rautela Birthday:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला आज आपला ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त उर्वशी रौतेलावर तिचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. उर्वशी रौतेला नेहमी तिच्या ड्रेसिंग स्टाइल, महागडी कपडे, सोन्याचा मोबाईल, जास्त फीमुळे चर्चेत असते. आपल्या करिअरसोबतच उर्वशी रौतेला तिच्या लक्झरी लाइफस्टाईलमुळे चर्चेत असते. सध्या ती पुन्हा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे उर्वशीने आपल्या वाढदिवशी सोन्याचा केक कापला. खास अंदाजमध्ये उर्वशीने आपला ३० वा वाढदिवस साजरा केला आहे.

उर्वशी रौतेला आज ३० वर्षांची झाली. अभिनेत्रीने 'लव्ह डोस 2'च्या सेटवर हनी सिंगसोबत तिचा वाढदिवस साजरा केला. उर्वशी रौतेलाने यावेळी २४ कॅरेट सोन्याचा केक कापला. उर्वशीच्या वाढदिवसापैक्षा तिने कापलेल्या सोन्याच्या केकची खूप चर्चा होत आहे. तिच्या वाढदिवसाचा केक पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. उर्वशीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'हेट स्टोरी 4' फेम उर्वशीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री हनी सिंगसोबत तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. ती थ्री-टायर २४ कॅरेटचा खरा सोन्याचा केक कापताना दिसत आहे. वाढदिवसानिमित्त उर्वशीने खास लूक केला होता. तिने रेड कलरचा साइड कट ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. यासोबत तिने ओपन हेअर, हेवी मेकअपस आणि गळ्यामध्ये पर्ल चोकर घालून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

फोटो शेअर करताना उर्वशी रौतेलाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लव्ह डोस 2 च्या सेटवर वाढदिवस सेलिब्रेशन. धन्यवाद हनी सिंग तुझी उपस्थिती माझ्या प्रवासाच्या टेपेस्ट्रीमध्ये कृतज्ञतेच्या धाग्याने विणलेली आहे. तुझे अथक प्रयत्न आणि खऱ्या काळजीने माझ्या करिअरमध्ये एक अद्भुत अध्याय निर्माण केला आहे. तुझ्यासाठी असलेल्या माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतील.'

उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, उर्वशी रौतेला शेवटची 'स्कंद'मध्ये दिसली होती. सध्या ती एका साऊथ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. उर्वशी इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. तिची फॅन फॉलोइंग लोकप्रिय अभिनेत्रींपेक्षा जास्त आहे. इन्स्टाग्रामवर ७० मिलियनपेक्षा अधिक जण तिला फॉलो करतात.

Urvashi Rautela
ओव्हर अ‍ॅक्टिंगचे ५० रुपये कट, Mitali Mayekar च्या 'त्या' VIDEO वर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com