ओव्हर अ‍ॅक्टिंगचे ५० रुपये कट, Mitali Mayekar च्या 'त्या' VIDEO वर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

Siddharth Chandekar And Mitali Mayekar: सिद्धार्थने आपली पत्नी मितालीचा असा व्हिडीओ शेअर केला आहे जो पाहून नेटिझन्स त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. काहींनी तिचे कौतुक केले आहे तर काहिंनी तिला ओव्हर अ‍ॅक्टिंग म्हटले आहे.
Mitali Mayekar Video
Mitali Mayekar VideoSaam Tv
Published On

Mitali Mayekar Video:

मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि तिचा पती सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. दोघेही नेहमी सोशल मीडियावर गमतीशीर व्हिडीओ शेअर करत असतात. कधी रील्स तयार करताना तर कधी एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतानाचे ते व्हिडीओ शेअर करत असतात. पण नुकताच सिद्धार्थने आपली पत्नी मितालीचा असा व्हिडीओ शेअर केला आहे जो पाहून नेटिझन्स त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. काहींनी तिचे कौतुक केले आहे तर काहिंनी तिला ओव्हर अ‍ॅक्टिंग म्हटले आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केलेल्या मितालच्या व्हिडीओमध्ये असं नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी मिताली मयेकरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मिताली मयेकर घरातमध्ये सोफ्यावर बसून टीव्ही पाहत आहे. ती सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांचा सुपरहिट चित्रपट 'नवरा माझा नवसाचा' पाहत आहे. या चित्रपटामधील एक-एक डायलॉग मितालीचे पाठ आहेत. ती हा चित्रपट सुरू असताना जसा-जसा एका एका व्यक्तीचा डायलॉग येत आहे तसं-तसं ती ते डायलॉग बोलत त्या व्यक्तींप्रमाणे नक्कल करत आहे. कधी सोप्यावर बसून तर कधी डायनिंग टेबलवर बसून ती चित्रपट पाहत त्यामधील डायलॉग बोलताना दिसत आहे.

मिताली मयेकरचा हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ चांदेकरने याला सुंदर कॅप्शन दिले आहे. 'म्युट करुन बघितला असतं तरी सगळे डायलॉग्स कळले असते! नाही का मिताली मयेकर' यासोबतच सिद्धार्थने या पोस्टमध्ये हॅशटॅग नवरा माझा नवसाचा देखील दिला आह. सिद्धार्थच्या या पोस्टवर मितालीने देखील कमेंट्स केली आहे. तिने असे लिहिले की, 'अरे देवा, मी खरंच किती हुशार आहे.' सिद्धार्थच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह त्याच्या आणि मितालीच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

Mitali Mayekar Video
Rakul Preet Singh ने लग्नानंतर सासरच्या मंडळींसाठी बनवला खास पदार्थ, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

सिद्धार्थ चांदेकरच्या या पोस्टवर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, 'ओव्हर अ‍ॅक्टिंगचे ५० रुपये कट', दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'सिद्ध विचार करतोय की कुठं कुठं न्यायचं हिला.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'बायको माझी नवसाची.' चौथ्या युजरने लिहिले की, 'टीम नवरा माझा नवसाचा २ प्लीज मिताली मयेकरला घ्या तमुच्या फिल्ममध्ये.' आणखी एका युजरने लिहिले की, 'अख्खा चित्रपट पाठ आहे. पूर्ण विरामा सकट.' या व्हिडिओला १ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Mitali Mayekar Video
FIR Against Producer: 7500 रुपयांचा वाद, अभिनेत्रीची चित्रपट निर्मात्याविरोधात तक्रार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com