Main Atal Hoon Trailer: 'मैं अटल हूं' चा दमदार ट्रेलर आऊट, पंकज त्रिपाठीच्या अभिनयाने जिंकलं मन

Pankaj Tripathi Movie Main Atal Hoon: या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील सर्व चढउतार उघड केले आहेत. पंकज त्रिपाठीच्या लूकसोबतच अभिनय देखील खूपच जबरदस्त आहे.
Main ATAL Hoon Trailer
Main ATAL Hoon TrailerSaam Tv
Published On

Main Atal Hoon Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता पंकज त्रिपाठीच्या ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाची (Main Atal Hoon Movie) घोषणा झाल्यापासून प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून याला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंकज त्रिपाठीच्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

3.38 सेकंदाच्या ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील सर्व चढउतार उघड केले आहेत. पंकज त्रिपाठीच्या लूकसोबतच अभिनय देखील खूपच जबरदस्त आहे. पंकज त्रिपाठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत अप्रतिम कॅप्शन दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्हाला माहीत असलेला नेता, ज्याला तुम्ही ओळखत नाही. श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या असामान्य जीवनाची ही एक झलक. #MainATALHoon चा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. 19 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये.'

या चित्रपटाच्या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठीचे लूक्सही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अटलबिहारींनी राजकारणात कसा प्रवेश केला? ते त्यांचा पंतप्रधान होईपर्यंतचा प्रवास हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याचवेळी हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहते आता चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या चित्रपटात अनेक स्टार्स दिसणार आहेत. भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओजच्या पाठिंब्याने या चित्रपटाची पटकथा ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी लिहिली आहे. तर सलीम-सुलेमान यांनी मनोज मुंतशिर यांच्या गीतांसह संगीत दिले आहे.

रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. ते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. ट्रेलरपूर्वी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्याचसोबत चित्रपटातील पंकज त्रिपाठीचे लूक्स देखील शेअर करण्यात आले होते. त्यानंतर चाहते या चित्रपटच्या ट्रेलरची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून हा ट्रेलर बुधवारी रात्री प्रेक्षकांच्या भेटीला आला. अटलबिहारी वाजपेयी यांचा संपूर्ण जीवनप्रवास पाहण्यासाठी प्रेक्षकांना १९ जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे.

Main ATAL Hoon Trailer
Dunki Movie: 'किंग खान'चे जबरा फॅन्स, 'डंकी' पाहून चित्रपटगृहात डान्स तर बाहेर फटाक्यांची आतिषबाजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com