
मुंबई: अभिनेता पंकज त्रिपीठीने कुणीही गॉडफादर नसताना बॉलीवूडमध्ये (Bollywood) स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'मिर्झापूर’, ‘क्रिमिनल जस्टिस’, ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्याचा उत्कृष्ट अभिनय पहिला आहे. ‘गुंजन सक्सेना’, ‘स्री’, ‘गॅंग ऑफ वासेपूर’ यांसारख्या चित्रपटाच्या (Movies) माध्यमातून पंकजने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
पंकज त्रिपाठी आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत असतो. पंकज अशाच एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. ही भूमिका कोणत्याही चित्रपटातील किंवा वेब सीरीजमधील (Web Series) नसून निवडणूक आयोगाने दिलेली जबाबदारी आहे. निवडणूक आयोगाने पंकज त्रिपाठीवर एक जबाबदारी सोपवली आहे. पंकज त्रिपाठीला निवडणूक आयोगाने 'नॅशनल आयकॉन' घोषित केले आहे. मतदानाचा अधिकार आणि मतदान याविषयी जनजागृती पंकज करणार आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आहे.
देशातील मतदानाचे प्रमाण वाढावे, तसेत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे याबाबत जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोग 'नॅशनल आयकॉन'ची निवड करते. २०१४ साली स्टार क्रिकेटर चेतेश्वर पुजारा 'नॅशनल आयकॉन'ची भूमिका बजावत होता. त्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला 'नॅशनल आयकॉन' घोषित करण्यात आले होते.
पंकज त्रिपाठीने कार्यक्रमादरम्यान त्याने पहिल्यांदा मतदान केले तेव्हाचा किस्सा सुद्धा सांगितला. मतदान केल्यामुळे त्याला सन्मान मिळाल्याचेही त्याने सांगितले. पंकजने तरुणांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे. पंकज त्रिपाठी दोन दशकांहून अधिक काळ कलाविश्वात कार्यरत आहे. पंकज लवकरच ‘ओह माय गॉड-२’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री यामी गौतमही हे देखील पंकजसह या चित्रपट दिसणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.