मुंबई: मराठी- हिंदी सिनेसृष्टीत सर्वात जास्त बघितला जाणारा रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. नुकताच २ ऑक्टोबरपासून मराठी बिग बॉस या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. काल बिग बॉसने चार गटातील सदस्यांना बहुमताच्या आधारावर त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद या सदस्यांना निरुपयोगी जाहिर केले. तसेच काल स्पर्धकांसह प्रेक्षकांना मोठे सरप्राईज दिले ते 'रुम ऑफ फॉर्च्युन'चे. ज्या खोलीमध्ये निरुपयोगी ठरलेल्या सदस्यांना चार दरवाजे दाखवत त्यातून एका स्पर्धकाची निवड करण्यात आली.
सर्वच स्पर्धकांमध्ये काटे की टक्कर पहिल्या दिवसापासून दिसत आहे. प्रिमियरपासून सर्वच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडल्याशिवाय जायचे नसल्याने स्पर्धकांपुढे हे मोठे आव्हान आहे. सांगकाम्या म्हणून जाहीर झालेल्या चारही सदस्यांना सर्वच कामे करावे लागणार असून त्यांना एक पॉवरही मिळाली आहे. हे सर्व स्पर्धक दिलेल्या पॉवरचा कसा वापर करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चौथ्या पर्वातल्या घरातील पहिले नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. पहिले कार्य 'आटली बाटली फुटली' असे आहे. यात कोणाला नॉमिनेट केले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत नॉमिनेशन कार्यादरम्यान अमृता देशमुखने सदस्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. तिचे म्हणणे आहे की,"बर नाही हे दिसत असून ही माझ्यावर येऊन बाटल्या फोडत आहात." तर त्रिशूलने निखिल राजशिर्केला जागवायची गरज आहे म्हणून नॉमिनेशनमध्ये टाकले. पहिल्या आठवड्यात कोणता सदस्य नॉमिनेट होणार?, कोणता सदस्य सेफ राहणार हे आजचा एपिसोड पाहिल्यावरच कळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.