Yevla News: येवल्यातील चित्रपटप्रेमींसाठी दसऱ्याआधीच 'गोड बातमी'

येवल्यात चित्रपटप्रेमींसाठी दसऱ्याआधीच 'गोड बातमी' देण्यात आली असून प्रेक्षकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण झाले आहे.
Cinema Hall
Cinema HallSaam Tv
Published On

येवला: चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळकेंची ओळख आहे. दादासाहेब फाळकेंनी (Dadasaheb Phalke) महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. चित्रपटांनी देशातच नव्हे तर जगभरात चांगलाच डंका वाजवला आहे (Marathi Cinema). मराठी चित्रपटांच्या दर्जेदार आशयाने काही चित्रपटांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. दादासाहेबांनी आपल्याला दिलेला चित्रपटाचा वसा आपण नक्कीच जोपासला पाहिजे असा महत्वपूर्ण सल्ला राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे.

Cinema Hall
Richa-Ali Wedding : रिचाच्या गालावर लग्नाची लाली; 'सुंदरा' कॅमेऱ्यात भरली...

यावेळी छगन भुजबळ म्हणाले, " मनोरंजनाची माध्यमे कालांतराने बदलत आहेत. आता चित्रपट फक्त टिव्हीवरच नाहीतर मोबईलवरही पाहू शकतात. हे सर्व आव्हाहने पेलत थिएटर मालकांनी या स्पर्धेत टिकून राहिले पाहिजे. काही खास प्रेक्षकवर्गाला गरजेच्या असणाऱ्या सर्व सुविधा त्यांना देऊ केल्या पाहिजेत. दादासाहेबांचे चित्रपटसृष्टीतील योगदान मोलाचे आहे. त्यांच्यामुळे भारतासह जगभरात सर्वदुर चित्रपट निर्मितीला सुरुवात करण्यात आली. दादासाहेब फाळकेंचा हा वसा नव्या पिढीने नक्कीच जोपासायला हवा."

Cinema Hall
Sonali Kulkarni: सोनालीच्या आयुष्यातील 'ही' सिक्रेट नवदुर्गा

छगन भुजबळ सध्या येवला मतदारसंघाचे आमदार आहेत. ते येवल्यातील मल्टिप्लेक्सच्या उद्घाटनावेळी म्हणाले की, 'मी येवला शहराचे गेल्या कित्येक दिवसापासून रुप बदलताना पाहत आहे. शहरात नवनवीन वास्तू, उद्योगधंद्याची भरभराट होत असल्याने शहराचा विकास होत असल्याचा आनंद होत आहे.'

कालांतराने येवला शहराचे नुतनीकरण होत असल्याने विकासात मोठी भर पडली आहे. मनोरंजनाच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचे असलेले मल्टिप्लेक्सने येवल्याच्या विकासात भर पडत आहे. असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com