मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा आज वाढदिवस असून ते आपल्या चाहत्यांसोबत ५२ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रवी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनीच नाही तर अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. २२ सप्टेंबर १९६६ रोजी मुंबईतील एका अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रवी यांनी अभिनेता म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
२०१० मध्ये त्यांनी मराठी चित्रपट ‘नटरंग’मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्या चित्रपटाची कथा डॉ. आनंद यादव यांच्या १९७८ च्या ‘नटरंग’ कादंबरीवर आधारित आहे. बालगंधर्व हा त्यांचा पुढचा चित्रपट होता. त्या चित्रपटाची कान्स आणि व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंग देखील पार पडली होती. रवी जाधव यांनी जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये शिक्षण घेतले आणि २००९चा मराठीतील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.
‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘न्यूड’ यासारखे गंभीर विषय हाताळलेल्या रवी यांनी ‘टाईमपास’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपटही केला. या चित्रपटाच्या पहिल्या दोन्ही भागांना विशेष लोकप्रियता मिळाली. तिसरा भाग म्हणावा तितका लोकप्रिय ठरला नसला तरी त्या चित्रपटानिमित्त रवी जाधव यांचे पुन्हा एकदा कौतुक झाले.
‘कच्चा लिंबू’ चित्रपटातून रवी जाधव एका नव्या भूमिकेत म्हणजे अभिनेता म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आला होता. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र विशेष कौतुकदेखील झाले. ‘कच्चा लिंबू’ चित्रपटातील रवी जाधव यांची भूमिका पाहून ते ॲक्टर म्हणूनही तेवढेच ताकदीचे आहेत, हे पाहायला मिळाले. दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांच्या कामाच्या शैलीची कायमच सर्वत्र कौतुक होते.
रवी जाधव यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांचे मनोरंजन करताना एखाद्या सामाजिक विषयाला कशाप्रकारे लोकांसमोर मांडता येते याचे उत्तम उदाहरणही त्यांनी दाखवून दिले आहे. सध्याच ‘ताली: बजाऊंगी नही, बजवाउंगी’ ही वेबसीरीज रवी जाधव दिग्दर्शित JioCinema वरील 2023 ची हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट वेबसीरीज ठरली. प्रेक्षकांनी या वेबसीरीजचे प्रचंड कौतुक केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.