Shah Rukh Khan : लग्नानंतर शाहरुख गौरीला खोटं बोलला, हनिमूनला पॅरिसला जाऊ म्हणाला अन् नेलं...,किस्सा वाचून पोट धरून हसाल

Shah Rukh Khan - Gauri Khan : शाहरुख खानने आपल्या हनिमूनचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. ज्यात तो गौरीसोबत खोटं बोलतो.
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanSAAM TV
Published On

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) बॉलिवूडचं पावर कपल आहे. शाहरुखने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याने आपल्या उत्तम अभिनयाने आणि दिलदार मनाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. शाहरुख खानने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये त्याच्या आयुष्यातील एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

शाहरुख खानने पत्नी गौरीला खोटे बोलून हनिमून घेऊन गेला होता. शाहरुखने गौरीला सांगितले की, आपण हनीमूनसाठी (Honeymoon ) पॅरिसला (Paris )जाणार आहोत. किंग खानने जेव्हा गौरीसोबत लग्न केलं तेव्हा त्याच्या करिअरची सुरुवात होती. मात्र त्यावेळी शाहरुखकडे तेवढे पैसे नव्हते. म्हणून शाहरुखने गौरीला पॅरिस बोलून हनिमूनसाठी दार्जिलिंगला घेऊन गेला. त्यावेळी किंग खानच्या 'राजू बन गया जेंटलमन' या चित्रपटाचे शूटिंग दार्जिलिंगमध्ये (Darjeeling ) सुरू होते. म्हणून त्यांनी आपले हनिमून स्पॉटही दार्जिलिंग ठेवले. शाहरुख खान आणि गौरीचं लग्न दिल्लीत पार पडलं होते.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या हनिमूनचा खर्च चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला होता. ते जेव्हा हनिमूनला गेले होते. तेव्हा दार्जिलिंगमध्ये खूप थंडी होती. पण त्यावेळी किंग खानच्या रुममध्ये एकही हीटर नसल्यामुळे निर्मात्यांनीचं हीटर देखील लावून दिला. शाहरुख आणि गौरी यांनी 1991 साली लग्नगाठ बांधली. यांना आर्यन, सुहाना आणि अबराम खान अशी तीन मुले आहेत. सुहानाने देखील बॉलिवूडमध्ये 'द आर्चीज' या चित्रपटातून पदार्पण केले. लवकरच आर्यनही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

Shah Rukh Khan
Sushas Joshi : मुंज्या फेम आजीला गौरवपदक, शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com