Darjeeling Places To Visit: वाढत्या उन्हामुळे त्रस्त झालात? तर मग करा 'दार्जिलिंग'ची सफर

Places To Visit on Darjeeling: उन्हाळ्यामध्ये थंड हिल स्टेशनला जायला कोणाला आवडणार नाही आणि त्यात जर ते हिल स्टेशन दार्जिलिंग असेल तर मग 'सोने पे सुहागा' म्हणायला काही हरकत नाही.
Darjeeling Tourism Places
Darjeeling TourSaam TV
Published On

वाढत्या गर्मीमुळे त्रस्त होऊन तुम्हीसुद्धा थंड ठिकाणी जाण्याचा प्लान करत आहात? तर मग हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. उन्हाळ्यामध्ये थंड हिल स्टेशनला जायला कोणाला आवडणार नाही आणि त्यात जर ते हिल स्टेशन दार्जिलिंग असेल तर मग 'सोने पे सुहागा' म्हणायला काही हरकत नाही.

Darjeeling Tourism Places
Tours & Travels च्या हनीमून पॅकेजच्या नावाखाली फ्लॅटमध्ये सुरु हाेतं भलतंच, चंद्रपूरात युवकास अटक

उन्हाळ्यात दार्जिलिंगचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. उन्हाळ्यातील हा थंडावा अनुभवण्यासाठी लोक येथे आवर्जुन येतात. पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील टेकड्यांवर वसलेले हे छोटे शहर सुट्टी घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत, तुमच्या जोडीदारासोबत येथे नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येऊ शकता. तर मग येथील काही निसर्गरम्य ठिकाणे जाणून घेऊयात.

टायगर हिल

कांचनजंगाचे शिखर पाहणे हा डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव आहे. उगवत्या सूर्याच्या किरणांनी सोनेरी झालेले कांचनजंगा शिखर पाहायला पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात.

टॉय ट्रेन

लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आनंद घेता येईल अशी टॉय ट्रेन येथे आहे. दार्जिलिंग स्टेशन ते घूम स्टेशन ऐवढा निसर्गरम्य प्रवास ही टॉय ट्रेन आपल्याला देते. या प्रवासाचे बतासिया लूप हे खास आकर्षण आहे.

बतासिया लूप

बतासिया लूप हे कांचनजंगा आणि बर्फाच्छादित हिमालयीन शिखरांच्या नेत्रदीप दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. बतासिया लूपच्या मध्यभागी शूर गोरखा सैनिकांच्या स्मरणार्थ एक युद्ध स्मारक बांधले गेले आहे. येथे स्थानिक लोक हस्तकला आणि लोकरीच्या वस्तू पाहण्यासाठी गर्दी करतात.

दार्जिलिंग रोपवे

दार्जिलिंग रोपवेला रंगीत व्हॅली केबल असेही संबोधले जाते. यातून सफर करताना चहाच्या बागा, हिरव्यागार दऱ्या, टेकड्या, नद्या, धबधबे आणि दूरवर चमकणारी हिमालय शिखरे यांचे सौंदर्य नजरेस पडते.

रॉक गार्डन

रॉक गार्डन दार्जिलिंग जू च्या १० किलोमीटर दूर आहे. रंगीबेरंगी सुगंधी फुले या बागेचे वैशिष्ट्य आहे. या फुलांसोबत तुम्ही सुंदर फोटोसुद्धा काढू शकता.

दार्जिलिंग जू

दार्जिलिंग जू चे खरे नाव 'पद्मजा नायडू हिमालयन प्राणीशास्त्र उद्यान' आहे. हे उद्यान हिमालयन पर्वतारोहण संस्थेजवळ आहे. हिमालय आणि इतर थंड डोंगराळ प्रदेशात आढळणारे प्राणी हे या प्राणीसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. येथे आल्यावर तुम्हाला विविध प्राणी पाहायला मिळतील. उदा. रेड पांडा, स्नो लैपर्ड.

दार्जिलिंगला भेट देण्याची योग्य वेळ

दार्जिलिंगला मार्च ते जून या महिन्यादरम्यान तुम्ही भेट देणे उत्तम राहील. तसेच दुर्गापूजा आणि ख्रिसमससाठी दार्जिलिंग खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही दार्जिलिंगला ट्रेन आणि विमानाने जाऊ शकता. दार्जिलिंगला जाण्यासाठी नवीन जलपाईगुड़ी रेल्वे स्टेशनपर्यंत तुम्ही ट्रेनने जाऊ शकता आणि त्यानंतर तेथून टॅक्सी, बसने तुम्ही दार्जिलिंगला पोहचता. हा ट्रेन प्रवास ३-४ तासाचा असतो. जर तुम्ही विमानाने जात असाल तर तुम्हाला बागडोगरा पर्यंत फ्लाइट घ्यावी लागेल. त्यानंतर टॅक्सीने तुम्ही दार्जिलिंगला पोहचू शकता.

Darjeeling Tourism Places
Travel Tips: मासिक पाळी दरम्यान प्रवास करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com