ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पीरियड्सच्या दिवसात लांबचा प्रवास करणे प्रत्येक तरूणीपासून ते महिलेला नकोसा वाटतो.
मात्र अनेकदा कार्यालयीन काम किंवा महत्त्वाच्या कामामुळे मासिक पाळीच्या दिवसात प्रवास करावा लागतो.
चला तर काही गोष्टी लक्षात ठेवू ज्यांच्या मदतीने या दिवसात प्रवास करणे सोप्पे होऊन जाईल.
मासिक पाळीच्या दिवसात शक्यतो घट्ट जीन्स घालणे टाळावे ज्या ऐवजी सैल कपडे परिधान करण्यास प्राधान्य द्यावे.
प्रवास करताना कायम सॅनिटरी पॅड जास्त ठेवावा.
मासिक पाळी दरम्यान प्रवास करताना तुम्ही तुमच्या सोबत अतिरीक्त कपडे सोबत ठेवा.
मासिक पाळी दरम्यान प्रवासात फास्ट फूड खाणे टाळावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.