Sushas Joshi : मुंज्या फेम आजीला गौरवपदक, शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Vishnudas Bhave Award : मुंज्या फेम सुहास जोशी यांना रंगभूमीवरील मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणता जाणून घ्या.
Vishnudas Bhave Award
Sushas Joshi SAAM TV
Published On

मराठी सिनेसृष्टीला अनेक मोठे कलाकार लाभले आहेत. त्यांचा अनेक वेळा सन्मान करून गौरवण्यात येते. आता मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी (Sushas Joshi ) यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळे त्यांना हा रंगभूमीवरील मानाच्या पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

5 नोव्हेंबरला रंगभूमी दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या निमित्त विष्णुदास भावे गौरव पुरस्कार (Vishnudas Bhave Award ) दिला जाणार आहे. हा 57 वा गौरव पुरस्कार आहे. या पुरस्कार विजेत्याला स्मृतीचिन्ह, श्रीफळ, शाल आणि 25 हजार रुपये देण्यात येणार आहे.

सुहास जोशी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी सिनेमा आणि नाटक केली आहेत. त्यांना आतापर्यंत व्हिडिओकॉन स्क्रीन पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा सह्याद्री नवरत्न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नाट्य दर्पणअजून अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत 25 मराठी नाटकं केली आहेत.

Vishnudas Bhave Award
Ranveer Singh : 'बेबी सिंबा'चा पहिला चित्रपट, दीपिकाच्या मुलीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, रणवीरकडून खुलासा

सुहास जोशी यांच्या व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द बॅरिस्टर नाटकापासून झाली. त्यांनी अनेक भूमिकांना उत्तमरित्या पार पाडल्या आहेत. सुहास जोशी यांची एकच प्याला, नटसम्राट ही नाटके खूप गाजली आहेत. तसेच मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. अलिकडेच सुहास जोशी 'मुंज्या' या चित्रपटात दिसल्या. त्यात त्यांनी आजीची भूमिका साकारली आहे.

Vishnudas Bhave Award
Ranveer Singh : 'बेबी सिंबा'चा पहिला चित्रपट, दीपिकाच्या मुलीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, रणवीरकडून खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com