Akshay Kumar: अक्षय कुमारच्या लेकीकडे अश्लील फोटोंची मागणी, आरोपी गजाआड; खिलाडीने सांगितली A टू Z माहिती

Akshay Kumar: मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेजमध्ये सायबर सुरक्षेवर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. अक्षय कुमारच्या मुलीच्या सायबरबुलिंग प्रकरणाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले आहे.
Akshay Kumar
Akshay KumarSaam Tv
Published On

Akshay Kumar: देशभरात झपाट्याने वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेज येथे सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना डिजिटल जगातील धोक्यांविषयी जागरूक करणे आणि ऑनलाइन सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणे हा होता.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सायबर विभाग यांच्या सहयोगाने करण्यात आले होते. या विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सायबर गुन्ह्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डिजिटल युगात सतर्क राहणे अत्यंत आवश्यक असून छोटीशी चूकही मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकते.

Akshay Kumar
Marathi Actress Harassment: त्याने अचानक मला पकडलं; मुंबईच्या रस्त्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला भयंकर प्रकार

ऑनलाइन गेमिंग सत्रादरम्यान निताराला आले अश्लील संदेश

एका कार्यक्रमात, यशस्वी यादव यांनी अक्षय कुमारची एक जुनी क्लिप दाखवली. या क्लिपमध्ये 'खिलाडी कुमार' आपल्या मुलीशी संबंधित एका घटनेचा किस्सा सांगताना दिसतात. तो म्हणतात; "मला तुमच्या सर्वांशी एक छोटीशी घटना सांगायची आहे. जी काही महिन्यांपूर्वी माझ्याच घरी घडली होती. माझी मुलगी एक ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळत होती. काही गेम्स असे असतात, ज्यात तुम्ही पूर्णपणे अनोळखी व्यक्तींसोबत खेळू शकता. खेळत असताना, तुम्हाला अनेकदा असे संदेश येतात, जसे की 'धन्यवाद, खूप मजा आली,' किंवा 'तू खूप छान खेळलीस.' अचानक, एका अनोळखी व्यक्तीने माझ्या मुलीला विचारले, 'तू कुठून आहेस?' तिने उत्तर दिले, 'मुंबई.'

Akshay Kumar
Marathi compulsory: 'आमच्या भाषेच्या विरोधात रस्त्यावर येत असाल, तर…'; अमराठी रिक्षाचालकांवर संतापला आणखी एक मराठी अभिनेता

"त्यानंतर, त्या व्यक्तीने विचारले, 'तू मुलगा आहेस की मुलगी?' माझ्या मुलीने उत्तर दिले, 'मुलगी.' त्यानंतर लगेचच, त्या व्यक्तीने तिला मेसेज पाठवला, 'तू मला तुझा एक न्यूड फोटो पाठवू शकशील का?' घाबरून जाऊन, माझ्या मुलीने तो गेम बंद केला आणि ती थेट माझ्या पत्नीकडे (ट्विंकल खन्ना) गेली. तिने या घटनेबद्दल आपल्या आईकडे मन मोकळे करण्याचा निर्णय घेतला.

मुले अनेकदा अशा प्रकारांना बळी पडतात आणि त्यानंतर त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल केले जाते. यामुळे आत्महत्येच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. आपण आपल्या मुलांना या डिजिटल जगाबद्दल शिक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे." अक्षय यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन केले की, शाळांमध्ये सायबर गुन्हेगारीविषयी जागृती करणारे वर्ग आयोजित केले जातील, याची त्यांनी खात्री करावी. यशस्वी यादव यांनी या आरोपीला अटक करण्यात आल्याचे देखील या सत्रात सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com