Marathi Actress Harassment: मुंबईत महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर घडली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे हिने स्वतःसोबत घडलेला अत्यंत धक्कादायक अनुभव उघड केला आहे. हा प्रकार मुंबईतील लोखंडवाला परिसरात घडल्याचं तिने सांगितलं आहे.
Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, मी पहाटेच्या ५-६ च्या सुमारास जॉगिंगसाठी बाहेर पडली होती.सूर्यही उगवला नव्हता. तेव्हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने एक माणूस गाडीतून आला आणि त्याने गाडीतूनच मला रस्ता विचारला. तो खूप हळू आवाजात बोलल्याने मला काही ऐकूच आलं नाही. त्यामुळे तो काय बोलतोय हे समजण्यासाठी मला त्याच्या गाडीजवळ जावे लागले. तेवढ्यात त्याने मला पकडलं. त्यानंतर त्याने गाडीचा वेग वाढवला.
तेव्हा माझ्या हातात गाडीची चावी होती. त्याचा मोठा रिमोट होता. तो रिमोट मी त्याच्या गाडीवर फेकून मारला आणि तो रिमोट त्या व्यक्तीच्या गाडीच्या मागच्या काचेला लागला. रिमोट काचेवर पडताच त्याने गाडी थांबवली. मी घाबरले. आजूबाजूलासुद्धा कुणी नव्हते. त्याने काही केलं तर मी काय करणार? असा विचार माझ्या मनात आला. त्याने गाडीला काही लागलं का बघितलं आणि तो निघून गेला. पण तो माझ्यासाठी सर्वात धक्कादायक प्रसंग होता.
या घटनेनंतर काही काळ ती हादरून गेली होती. 'जर त्याने गाडी मागे घेतली असती तर काय झालं असतं, हा विचार अजूनही मनात येतो,” असंही तिने सांगितलं. या प्रसंगातून सावरल्यानंतर नेहा पेंडसेने महिलांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. मोठ्या शहरांमध्येही अशा घटना घडत असल्याने स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचं तिने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.