हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता गोप यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक घटना आजही चर्चेत आहे. मरण्याचा सीन साकारताना त्यांचा खरोखरच मृत्यू झाला होता, आणि त्या क्षणी उपस्थित लोकांना तो फक्त अभिनय वाटत राहिला.
लाईव्ह हिंदुस्तानच्या माहितीनुसार, दिग्दर्शक कुंदन कुमार यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली. एका सीनमध्ये गोप यांना हृदयविकाराचा झटका येऊन पडायचे होते. कॅमेरा सुरू होताच त्यांनी अत्यंत वास्तवदर्शी अभिनय केला आणि जमिनीवर कोसळले. त्यांचा अभिनय इतका प्रभावी होता की सेटवरील लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
मात्र, 'कट' म्हणल्यानंतरही गोप उठले नाहीत. सुरुवातीला सर्वांना वाटले की ते अजूनही अभिनय करत आहेत, पण काही वेळाने जवळ जाऊन पाहिल्यावर धक्कादायक सत्य समोर आले. त्यांना खरोखरच हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
गोप हे १९४०-५० च्या दशकातील हिंदी सिनेमातील लोकप्रिय कॉमेडियन होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत १४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांना आपल्या विनोदी अभिनयाने खूप हसवले. ‘मेरे पिया गए रंगून’ या गाण्यातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. १९५७ साली त्यांचे निधन झाले, आणि त्यांच्या मृत्यूची ही घटना चित्रपटसृष्टीतील सर्वात विचित्र आणि दुःखद प्रसंगांपैकी एक मानली जाते. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.