Actor House Burgled: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी; मोलकरणीने लंपास केले लाखोंचे दागिने आणि रोकड

Actor House Burgled: 'F.I.R.' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेला विपुल रॉय याच्या घरी चोरी झाली आहे. त्याच्या घरातील मोलकरणीने सोने-चांदीचे दागिने, तसेच लाखो रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Actor House Burgled
Actor House BurgledSaam tv
Published On

Actor House Burgled: टीव्ही अभिनेता विपुल रॉय याच्या निवासस्थानी लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. खार पोलिसांनी त्याच्या घरी काम करत असलेल्या घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिलेने विपुल रॉय यांच्या घरातून सोने-चांदीचे दागिने, तसेच भारतीय आणि परदेशी चलन चोरल्याचा आरोप आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंची किंमत एकूण ७.१० लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. ही घटना ६ एप्रिल रोजी घडली असून, २१ एप्रिल रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा आरोप

एफआयआर (FIR) नुसार, विपुल रॉय त्याची पत्नी आणि मुलीसह खार पश्चिम येथील एस.व्ही. रोडवरील 'कलानिकेतन सोसायटी'च्या १० व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १००१ मध्ये राहतो. घरातील कामांमध्ये मदत करण्यासाठी ते अधूनमधून 'अर्बन कंपनी' (Urban Company) या ऑनलाइन सेवा प्लॅटफॉर्मद्वारे घरकाम करणाऱ्यांना कामावर बोलावित असत. अभिनेत्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी त्यांनी घराची साफसफाई आणि इतर घरगुती कामे करण्यासाठी 'अर्बन कंपनी'मार्फत दिपाली संजय खरवा (वय ३५) या महिलेला कामावर बोलावले होते.

Actor House Burgled
Actor Instagram Hacked: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं अकाऊंट हॅक; आठवड्याभरात चाहत्यांची आर्थिक फसवणूक, नेमकं काय घडलं?

यापूर्वीही ती तीन-चार वेळा त्यांच्या घरी कामासाठी आली होती

विपुल रॉय यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी मुद्दाम दिपालीलाच कामावर बोलावण्याची विनंती केली होती, कारण यापूर्वीही ती तीन-चार वेळा त्यांच्या घरी कामासाठी आली होती. मात्र, ती अशा प्रकारची कृती करेल, याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती. अभिनेत्याने सांगितले की, वारंवार घरी येत असल्यामुळे दिपालीला कुटुंबाची दैनंदिन दिनचर्या आणि घरातील विविध वस्तू कुठे ठेवल्या आहेत याची चांगलीच माहिती होती.

Actor House Burgled
Bhooth Bangla Trailer Review: नव्या चित्रपटाचा जुना ट्रेलर; अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये 'भागमभाग', 'भूल भुलैया'ची खिचडी

विपुल रॉय यांनी ६ एप्रिलच्या घटनाक्रम सांगितला

६ एप्रिल रोजी सकाळी साधारण ९:४५ वाजता, बेडरूमची साफसफाई करत असताना, दिपाली खरवा हिने विपुल रॉयला ओल्या पायांनी खोलीत प्रवेश न करण्याची विनंती केल्याचे सांगितले कारण तिने नुकतीच खोलीची साफसफाई पूर्ण केली होती. त्यानंतर तिने खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. साधारण १५ मिनिटांनंतर ती खोलीतून बाहेर आली आणि तिला सोपवलेली कामे पूर्ण केल्यानंतर ती तिथून निघून गेली. त्यानंतर विपुल कामावर निघून गेले आणि रात्री साधारण १०:०० वाजता घरी परतले. त्याच रात्री घरी परतल्यावर, जेव्हा विपुल रॉयने आपलं कपाट उघडलं, तेव्हा त्याला त्याचे दागिने तसेच भारतीय आणि परकीय पैसे गायब असल्याचं कळलं.

आपल्या एफआयआरमध्ये (FIR), विपुल रॉयने नमूद केले की ३० अमेरिकन डॉलर्स, ७,००० यूएई दिरहम्स्, १४,५०० थाई बाहत आणि ६ लाख रुपये चोरीस गेले आहेत. याव्यतिरिक्त, एक चांदीचा ब्रेसलेट आणि सोन्या-हिऱ्याच्या दोन अंगठ्या देखील गायब आहेत. एकूणच, ७.१० लाख किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे. विपुलचा असा आरोप आहे की, त्याची घरकाम करणारी बाई दिपाली हिनेच ही चोरी केली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

गुन्हा दाखल केल्यानंतर, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे, संशयित महिलेचे (दिपालीचे) ठिकाण शोधणे सुरू केले आहे. पोलिसांनी दिपाली खरवा हिच्या विरोधात 'भारतीय न्याय संहिता'च्या कलम ३०६ (नोकर किंवा सेवकाकडून मालकाच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेची चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com