Hemant Dhole: महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या मुंबई ऑटो-रिक्षाच्या युनियनने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात ४ मे पासून आंदोलन करण्याची घोषणा सोमवारी केली आहे. या युनियनमध्ये एकूण १५ लाख रिक्षा चालकांचा समावेश आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमेने केलेली सोशल मीडिया पोस्टवर सध्या चांगलीच चर्चेत आहे.
आंदोलनाचा इशारा
राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात मुंबईसह राज्यभरातील रिक्षाचालक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेमंत ढोमेची पोस्ट
याच पार्श्वभूमीवर हेमंत ढोमेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपले स्पष्ट मत मांडले. त्याने लिहिले की, “१५ लाख लोकांना मराठी नकोय का? मग जिथून आलात तिथे परत जा. तिथे कमवा आणि खा. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!.” ढोमेच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
हा निर्णय आधीचं घेतला पाहिजे होता
हेमंत ढोमेने मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त करत राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाने स्थानिक भाषा समजून घेणे आणि तिचा सन्मान करणे आवश्यक असल्याचेही नमूद केले. त्याच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी समर्थन देत सरकारने हा निर्णय आधीचं घेतला पाहिजे होता असे मत व्यक्त केले आहे.
कारवाई होऊ शकते
दरम्यान, १ मेपासून लागू होणाऱ्या नियमांनुसार रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येते का याची पडताळणी केली जाणार आहे. ही अट पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.