Tabbu Debut Hollywood : तब्बू आता हॉलिवूड गाजवणार, अमेरिकन टीव्ही शोमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Tabbu Cast In Dune Prophecy : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आता हॉलिवूडपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ड्यून: प्रोफेसी' मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tabbu Debut Hollywood
Tabbu Debut HollywoodSaam Tv

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आता हॉलिवूडपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री एका अमेरिकन टीव्ही सीरियलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ड्यून: प्रोफेसी' मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tabbu Debut Hollywood
Alia Bhatt Interview : "अन्यथा भविष्यात तुला 'ती' चूक महागात पडेल...", आलिया भट्टला वडिलांनी लेकीसाठी दिला मोलाचा सल्ला

2019 मध्ये ही टीव्ही सीरियल “Dune: The Sisterhood” नावाने सुरू झाली. ही सीरियल ब्रायन हर्बर्ट आणि केविन जे. अँडरसन यांच्या “सिस्टरहुड ऑफ ड्युन” या पुस्तकावर आधारित आहे. सायन्स आणि फिक्शन ड्रामावर आधारित या सीरियलची कथा आहे. सिस्टर फ्रान्सिस्काचा या मालिकेत आतापर्यंत अनेकदा उल्लेख झाला आहे. 'डून: प्रोफेसी' या सीरियलमध्ये, सिस्टर फ्रान्सिस्काचं कॅरेक्टर तब्बू साकरणार आहे. या सीरियलमध्ये तिचं कॅरेक्टर सुंदर आणि हुशार असे आहे.

तब्बूच्या या सीरियलमध्ये एमिली वॉटसन, ऑलिव्हिया विल्यम्स, ट्रॅव्हिस फिमेल, जोहडी मे, मार्क स्ट्राँग, सारा-सोफी बोस्निना, जोश ह्यूस्टन, क्लो ली, जेड अनौका, फॉलिन कनिंगहॅम, एडवर्ड डेव्हिस, एओईफ हिंड्स, ख्रिस मेसन आणि शलोम यांच्या भूमिका आहेत. या अमेरिकन टीव्ही सीरियलच्या आधी तब्बू 'क्रू' या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती. तिच्यासोबत चित्रपटात करीना आणि क्रिती सेननही दिसली होती. त्यासोबतच लवकरच क्रिती 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tabbu Debut Hollywood
Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचे हरियाणा कनेक्शन, गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com