Crew Twitter Review: करीना-क्रिती आणि तब्बूच्या 'क्रू'ने जिंकली प्रेक्षकांची मनं, कथा-संवाद आणि अभिनयाला फुल मार्क्स

Crew Movie Released: या चित्रपटामध्ये करीना, क्रिती आणि तब्बू या तिघी मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट मनोरंजनाची खास पर्वणी ठरत आहे. 'क्रू' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई केली होती.
Crew Movie
Crew Movie Saam Tv

Crew Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor), क्रिती सेनॉन (Kriti Senon) आणि तब्बू स्टारर 'क्रू' चित्रपट (Crew Movie) अखेर आज रिलीज झाला. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची बरीच चर्चा होती. चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज हा चित्रपट रिलीज झाला. फर्स्ट डे फर्स्ट शोला प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगली पसंती दिली.

या चित्रपटामध्ये करीना, क्रिती आणि तब्बू या तिघी मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट मनोरंजनाची खास पर्वणी ठरत आहे. 'क्रू' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई केली होती. त्याचा परिणाम आज चित्रपटगृहांमध्ये दिसून आला. 'क्रू' चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची मोठी रांग लागली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक आता सोशल मीडियावर करीना आणि क्रितीचा 'क्रू' चित्रपट कसा वाटला यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू यांचा चित्रपट 'क्रू' रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत होता. आगाऊ बुकिंगमध्ये या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर 'क्रू' त्याच्या कथेसाठी आणि स्टार्सच्या अप्रतिम अभिनयामुळे चर्चेत आहे. सोशल मीडिया यूजर्स करीना कपूरच्या 'क्रू' चित्रपटावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 'क्रू'मधील करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू यांचा अभिनय काहींना आवडला. तर चित्रपटाच्या कथेने अनेकांचे मनं जिंकले आहे. याशिवाय चित्रपटातील संवादही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ट्विटरवर त्यांना चित्रपटातील आवडलेला सीनचा फोटो पोस्ट करत त्यांना चित्रपट कसा वाटला हे शेअर केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, 'क्रू चित्रपट खूपच मनोरंजन करणा आहे. चित्रपटातील डायलॉग आणि स्टोरी खूपच भारी आहे. फॅमिलीसोबत जाऊन पाहावा असा चित्रपट आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, क्रू पाहण्यासाठी चित्रपटगृह पूर्णत: ब्लॉकबस्टर' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'क्रू चित्रपट ओपनिंग डेला १० ते १२ कोटींची कमाई करेल असा अंदाज आहे.'

दरम्यान, 'क्रू' ने आपल्या ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनमध्ये 4431 शोसाठी 31,126 तिकिटे विकली होती. चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच सुमारे 72 लाख रुपयांची कमाई केली होती. तर अभिनेत्री करीना कपूर 'क्रू' या चित्रपटाद्वारे बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याआधी करीना कपूर मोठ्या पडद्यावर आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसली होती.

Crew Movie
Kangana Ranaut: ऐवढा सन्मान जगात कुणालाच मिळत नाही..., उर्मिला मातोंडकरवरील वक्तव्यावर कंगना रनौतचे स्पष्टीकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com