Alia Bhatt Interview : "अन्यथा भविष्यात तुला 'ती' चूक महागात पडेल...", आलिया भट्टला वडिलांनी लेकीसाठी दिला मोलाचा सल्ला

Alia Bhatt On Her Daughter Raha : एका मुलाखतीत आलिया भट्टने मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय आलियाने वडील महेश भट्ट यांनी लेक राहाबद्दल सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टीचाही तिने खुलासा केलेला आहे.
Alia Bhatt On Her Daughter Raha
Alia Bhatt On Her Daughter RahaSaam Tv

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कायमच आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या सौंदर्याची चर्चा फक्त भारतातच नाही तर जगभरात होत असते. आलिया जितकी प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते, तितकीच ती पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. आलियाने २०२२ मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला, तिचं नाव तिने राहा असं ठेवलं आहे. आलियाप्रमाणेच राहाच्याही क्यूटनेसची चर्चा होते. एका मुलाखतीत आलियाने राहासाठी सतावत असलेली चिंता बोलून दाखवली आहे.

Alia Bhatt On Her Daughter Raha
Amey Wagh Post: 'आता कोणीही कोणत्याही पक्षात जावं, युती करावी....' अमेय वाघची मतदानानंतर पोस्ट

दिग्दर्शक महेश भट्ट यांनी राहाबद्दल महत्वाचा सल्ला दिलेला आहे. मुलाखतीत आलियाने वडील महेश भट्ट यांच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षणाबद्दल सांगितले आहे. आलिया म्हणाली की, "अलीकडेच मला वडिलांनी राहासाठी महत्त्वाचा सल्ला दिला. जर तू राहाला पडून- झडून देणार नसेल, तर ती तुझी फार मोठी चूक असेल. कारण राहा भावी आयुष्यात कठीण परिस्थितीत स्वत:ला धीट ठेवू शकणार नाही."

पुढे ती मुलाखतीत म्हणाली की, "जेव्हा घर सोडलं त्यावेळी मी जेमतेम २३ वर्षांचीच होते. मी फार लवकर घराच्या बाहेर पडले. पण मी ही गोष्ट राहासोबत होऊन देणार नाही. मी शुटिंगमुळे जास्त दिवसांसाठी घराबाहेरच राहायची. कधीकधी तर मी कोणत्या शहरात आहे, याची ही माहिती नसायची. ज्यावेळी मी माझ्या स्ट्रगलच्या दिवसांकडे पाहते, तेव्हा मी किती संयमी आहे, असं मला वाटतं. मला कमी वयात हे धाडस करायला मिळाल्यामुळे मी स्वतःला आणखी ओळखत गेले."

Alia Bhatt On Her Daughter Raha
Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचे हरियाणा कनेक्शन, गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला अटक

" मी जेव्हा प्रेग्नेंट होते, तेव्हा लंडनमध्ये 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटाच्या शुटिंगवेळी माझ्या मनात अपराधीपणाची भावना येत होती. मी तीन दिवस झोपले नव्हते. मी चांगली मुलगी नाही, अशी भावना माझ्या मनात येत होती. माहिती नाही असं हॉर्मोन्समुळे कदाचित झालं होतं… पण माझ्या लक्षात आहे की, मी प्रेम, काळजी, जबाबदारी यांमुळे भावूक झाली होती…’ असं आलिया मुलाखतीत म्हणाली आहे.

Alia Bhatt On Her Daughter Raha
Disha Vakani Replaced : ३ वर्षांपासून ऑडिशन सुरू, ती १००% दयाबेन...; दिशा वकानी ऐवजी कोण येणार ? जेनिफर मिस्त्रीने केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com