Amey Wagh Post: 'आता कोणीही कोणत्याही पक्षात जावं, युती करावी....' अमेय वाघची मतदानानंतर पोस्ट

Amey Wagh Post After Voring For Election: सोमवारी १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडली. काल नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्याचसोबत अनेक कलाकारांनी मतदान केले आहे.
Amey Wagh Post
Amey Wagh Post Saam Tv
Published On

सोमवारी १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडली. काल नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्याचसोबत अनेक कलाकारांनी मतदान केले आहे. महाराष्ट्रात अमोल कोल्हे, सुबोध भावे, गिरिजा ओक अशा अनेक कलाकरांना मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. मतदान केल्यानंतर अभिनेता अमेय वाघनेदेखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. (Amey Wagh Share A Post After Voting)

अमेय वाघने (Amey Wagh) मतदान केल्यानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात अमेयने बोटावरची शाई दाखवून मतदानाचा हक्क बजावला असल्याचे सांगितले आहे. या पोस्टवर त्याने कॅप्शन दिले आहे की, आता कोणीही कोणत्याही पक्षात जावं आणि कोणाही बरोबर युती करावी यासाठी मी आज परवानगी देऊन आलो!. अमेयच्या या पोस्टची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. अमेयने या पोस्टच्या माध्यमातून सध्याची राजकीय परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Amey Wagh Post
Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचे हरियाणा कनेक्शन, गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला अटक

अमेयसोबतच काल अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर काही कलाकारांना मतदान करता आले नाही, याबद्दल खंत व्यक्त केली आहे. अभिनेता सुयश टिळकला काल मतदान करता आले नाही, त्यामुळे त्याने खंत व्यक्त केली होती. सुयशने काल बूथवर जाऊन आपले नाव शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला नाव सापडलेच नाही. त्याच्या नावात काहीतरी चूक असल्याने त्याला मतदान करता आले नाही, यामुळे त्याने खंत व्यक्त केली होती.

Amey Wagh Post
Suyash Tilak: मला तो हक्क बजावता आला नाही, मतदान करता न आल्यामुळे सुयश टिळकने व्यक्त केली खंत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com