बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Swara Bhasker Hospitalized: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला डेंग्यूची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत चाहत्यांना प्रकृतीची माहिती दिली.
Swara Bhasker Hospitalized
Swara Bhasker admitted to hospitalsaam tv
Published On
Summary
  • अभिनेत्री स्वरा भास्करला डेंग्यूची लागण

  • डेंग्यूवरील उपचारासाठी स्वरा भास्करला रुग्णालयात दाखल

  • स्वरा भास्करच्या प्रकृतीच्या बातमीने चाहत्यांमध्ये चिंता निर्माण

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला डेंग्यूची लागण झाली असून याबाबत स्वतः अभिनेत्री स्वरा भास्कर हिने हॉस्पीटल मधील फोटो पोस्ट करत तब्येतीची माहिती दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर रुग्णालयातील तिच्या बेडवरून एक फोटो शेअर केला असून तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

Swara Bhasker Hospitalized
Govinda: गोविंदासोबत एयरपोर्टवर दिसलेली 'मिस्ट्री गर्ल' कोण? सुनीता आहुजांनी याच नावाचा केला होता उल्लेख

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. स्वरा भास्करने रुग्णालयातील आपल्या बेडवरून इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले, "हे सर्व खूप वेगाने घडले. मला डेंग्यू झाला आणि मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले!"

दरम्यान, 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर हिलाही डेंग्यूची लागण झाली आहे. तीही रुग्णालयात दाखल आहे. तिचा नवरा मिलिंद चंदवानी याने तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आणि सांगितले की, आजारी असूनही ती काम करत होती. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात मिलिंदने सांगितले की, अविका गेल्या पाच दिवसांपासून तीव्र तापाचा सामना करत होती.

Swara Bhasker Hospitalized
Tanvi Kolte: 'चाकरी' गाण्यात तन्वी कोलतेचा नवा अंदाज; बिग बॉस मराठीनंतर पहिल्यांदाच अल्बम साँगमध्ये झळकली

स्वरा भास्करचा नवीन शो

स्वरा भास्कर बॉलिवूड चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर आपली स्पष्ट मते मांडण्यासाठी ओळखली जाते. स्वरा भास्करला अलीकडेच तिचा पती फहाद अहमद याच्यासोबत 'पती पत्नी और पंगा' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com