Govinda: गोविंदासोबत एयरपोर्टवर दिसलेली 'मिस्ट्री गर्ल' कोण? सुनीता आहुजांनी याच नावाचा केला होता उल्लेख

Govinda: गोविंदा मुंबई एयरपोर्टवर दिसलेली 'मिस्ट्री गर्ल'नंतर चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे सुनीता आहुजांनी यापूर्वी कोमल नावाच्या तरुणीचा उल्लेख केला होता.
Govinda
GovindaSaam Tv
Published On

Govinda: ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता गोविंदा गेल्या काही काळापासून त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनीता आहुजा यांनी गोविंदाचे अफेअर असल्याचे केलेले दावे आणि त्यानंतर समोर येणाऱ्या चर्चांमुळे गोविंदाचे नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे. आता गोविंदा मुंबई विमानतळावर एका तरुणीसोबत दिसल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई विमानतळावर गोविंदा एका तरुणीसोबत चालताना दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही तरुणी नेमकी कोण आहे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या ‘मिस्ट्री गर्ल’चे नाव कोमल राणी स्वर्णकार असल्याचे समोर आले आहे.

Govinda
Famous Actress Hospitalised: १०४ ताप, चेहरा थकलेला...; प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने केलं रुग्णालयात दाखल

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी यांनी गोविंदा आणि कोमलचा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये गोविंदा काळ्या डेनिमसह पांढरा शर्ट आणि काळे जॅकेट परिधान केलेला दिसत आहे. तर कोमल पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. दोघेही विमानतळावर एकत्र चालताना पाहायला मिळाले.

Govinda
Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

सुनीता आहुजांनी घेतलं होतं कोमलचं नाव

गोविंदासोबत कोमल दिसल्याने या चर्चेला आणखी एक वेगळा संदर्भ मिळाला आहे. कारण गोविंदाच्या अफेअरबद्दल बोलताना त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी यापूर्वी ‘कोमल’ नावाच्या एका तरुणीचा उल्लेख केला होता.जानेवारीमध्ये मिस मालिनी यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीत सुनीता यांनी गोविंदाच्या अफेअर्सबद्दल भाष्य केले होते. यावेळी त्यांनी ‘कोमल’ नावाच्या मुलीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र, गोविंदाचे कोणाशीही संबंध असल्याचे अधिकृतपणे सिद्ध झालेले नाहीत.

कोमल राणी स्वर्णकार कोण आहे?

कोमल राणी स्वर्णकार ही ग्लॅमर विश्वातील नवी अभिनेत्री असून ती उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. ती गोविंदासोबत ‘रूपा’ या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. गोविंदाने या चित्रपटाची घोषणा करताना कोमलचे कौतुक केले होते. भविष्यात तिच्यासोबत काम करण्याची आणि अनेक हिट चित्रपट देण्याची इच्छा असल्याचेही त्याने म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com