Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

Mithun Chakraborty Hospitalized: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती कोलकात्यातील खासगी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया झाली. सुवेंदू अधिकारी यांनी भेट घेत प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.
Mithun Chakraborty Hospitalized
Mithun Chakraborty HospitalizedSaam Tv
Published On

Mithun Chakraborty Hospitalized: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुरुवारी रात्री किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून लवकरच त्यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून अभिनेत्याच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत मिथुन यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

Mithun Chakraborty Hospitalized
Makeup influencer Death: प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि इन्फ्लुएन्सरचे कार अपघातात मृत्यू; वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यांच्या आजाराबाबत किंवा शस्त्रक्रियेबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेबाबतची माहिती सार्वजनिक करू नये, अशी मिथुन यांची इच्छा होती.

Mithun Chakraborty Hospitalized
Thalapathy Vijay: थलपथी विजय यांचा संसार पुन्हा रुळावर? पत्नी संगीताने घटस्फोटाची याचिका घेतली मागे

रुग्णालयात भेट घेतल्या सुवेंदू अधिकारी यांनी मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. तसेच त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतरही त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत सकारात्मक माहिती दिली.

मिथुन चक्रवर्ती हे चक्रवर्ती १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आजही अनेक महत्त्वाच्या चित्रपटांशी ते जोडलेले आहेत. २०२५ मध्ये त्यांनी श्रीमान वर्सेस श्रीमती (Shriman vs. Shrimati), द बंगाल फाइल्स (The Bengal Files) आणि प्रजापती २ (Prajapati 2) यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या सनी देओल यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि आमिर खानच्या बॅनरखाली निर्मित होत असलेल्या बटवारा १९४७ (Batwara 1947) या बहुप्रतिक्षित चित्रपटात ते एका विशेष भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com