बॉलीवूडची पहिली लेडी सुपरस्टार म्हणून ओळख असणाऱ्या श्रीदेवीचा आज जन्मदिवस. बॉलिवूडची ‘चांदनी’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध राहिलेली श्रीदेवी जरीही आज आपल्यात नसली तरीही ती तिच्या अभिनयातून चाहत्यांमध्ये जिवंत आहे. आज अभिनेत्रीच्या जन्मदिवसानिमित्त तिच्या फिल्मी करियरबद्दल जाणून घेऊया...
आपलं सौंदर्य आणि अदाकारी अभिनयाने तिने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रीदेवीचा १३ ऑगस्ट १९६३ रोजी जन्मदिवस असतो. अगदी बालपणापासूनच त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं करियर केलं होतं. त्यांच्या फिल्मी करियरची सुरुवात बॉलिवूडपासून नाही तर टॉलिवूडपासून झाली होती. श्रीदेवी यांचं खरं नाव श्री अम्मा यंगेर अय्यप्पन असं होतं.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची ८० आणि ९० च्या काळातील फिल्मी लव्हस्टोरी होती. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचं आधी एकतर्फी प्रेम होतं. १९७८ मध्ये रिलीज झालेल्या ‘सोलहवां सावन’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले. याच चित्रपटात बोनी यांनी श्रीदेवी यांना पाहिलं आणि निर्माता म्हणून श्रीदेवीसोबत काम करण्याचे ठरवले. बोनी कपूर श्रीदेवी यांच्यासाठी चित्रपटाची ऑफर घेऊन थेट त्यांच्या घरीच पोहोचले. त्यावेळी बोनी यांनी श्रीदेवी यांना ‘मिस्टर इंडिया’ साठी विचारलं होतं. श्रीदेवी यांनी बोनी यांना माझ्या चित्रपटाचे सर्व कामं माझी आई पाहते, असं म्हणत त्यांच्या आईकडे पाठवलं होतं.
तर श्रीदेवी यांच्या आईने चित्रपटाला होकार तर दर्शवला. पण मानधनात मोठी मागणी केली होती. “माझी मुलगी तुमच्या चित्रपटात काम करेल पण, १० लाख रुपये मानधन घेईल.” तर बोनी कपूर १० लाख नाही मी ११ लाख देतो. असं म्हणत ‘मिस्टर इंडिया’ साठी श्रीदेवी यांना फायनल केले. बोनी यांचं श्रीदेवी यांच्यावर एकतर्फी प्रेम होतं. त्यामुळे ते चित्रपटाच्या सेटवर किंवा शूटिंग दरम्यान श्रीदेवी यांना काही त्रास तर होत नाही ना, याची विशेष काळजी घ्यायचे. बोनी यांना श्रीदेवी यांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी १२ वर्ष लागली. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लव्हस्टोरी ही एका चित्रपटाप्रमाणेच होती.
श्रीदेवी आणि बोनी कपूर २ जून १९९६ रोजी लग्नबंधनात अडकले. बोनी कपूर यांचं मोनासोबत लग्न झालेलं असतानाही त्यांनी श्रीदेवीसोबत लग्न केले. मोना आणि श्रीदेवी यांना अर्जुन आणि अंशुला असे दोन मुलं होते. तर श्रीदेवी यांना जान्हवी आणि खुशी अशा दोन मुली आहेत. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन- अंशुला आणि जान्हवी- खुशी एकमेकांसोबत बोलू लागले. श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांनी सावत्र बहिणींना आपलंसं केलं. त्यापूर्वी ते एकमेकांशी बोलत नव्हते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.