Boney Kapoor: बोनी कपूर उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारणार, कुठे आहे लोकेशन आणि कसा असणार प्लॅन?

Uttar Pradesh Film City: हा उत्तर प्रदेश सरकारच्या मोठ्या प्रोजेक्टपैकी एक असणार आहे. यासोबतच पहिल्या टप्प्यामध्ये 230 एकरांवर फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये उभारण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीसाठी चार कंपन्यांनी बोली लावली होती.
Boney Kapoor
Boney KapoorSaam Tv
Published On

Boney Kapoor Will Build Film City In Uttar Pradesh:

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) फिल्मी सिटी (Film City) उभारण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून (Uttar Pradesh Government) देखील याबाबत काम सुरू आहे. गौतमबुद्ध नगरच्या जेवर येथे ही फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. हा उत्तर प्रदेश सरकारच्या मोठ्या प्रोजेक्टपैकी एक असणार आहे. यासोबतच पहिल्या टप्प्यामध्ये 230 एकरांवर फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये उभारण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीसाठी चार कंपन्यांनी बोली लावली होती. त्यापैकी एक कंपनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आणि एक कंपनी चित्रपट निर्माता बोनी कपूरची होती. टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही यामध्ये सहभाग होता. पण आता समोर आलेल्या बातम्यांनुसार, बोनी कपूर यांनी सर्वांना मागे टाकत हा प्रोजेक्ट आपल्या नावावर केला आहे. त्यानुसार आता बोनी कपूर उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारणार आहेत.

यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या सेक्टर 21 मध्ये बांधण्यात येत असलेली हे ग्लोबल टेंडर आता बोनी कपूर यांना देण्यात आले आहे. ही बोली मंगळवारी आयोजित करण्यात आली होती ज्यात बोनी कपूर यांनी भूतानी ग्रुप या रिअल इस्टेट कंपनीच्या सहकार्याने ही बोली जिंकली आहे. त्यामुळे आता बोनी कपूर ही फिल्म सिटी बांधणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासोबतच या प्रोजेक्टच्या उभारणीत विलंब झाल्यास दररोज १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, असे उत्तर प्रदेश सरकारने कंपनीला सांगितले आहे.

Boney Kapoor
Bigg Boss 17: मुनव्वर फारुकीच्या विजय रॅलीत ड्रोनचा वापर, डोंगरी पोलिसांनी दाखल केला गुन्हा

बोनी कपूर यांच्या कंपनीने ही बोली जिंकली असली तरी देखील आतापर्यंत त्यांना उत्तर प्रदेश सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. अशा परिस्थितीत सध्या सर्वजण या प्रोजेक्टच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. बोनी कपूर यांच्यासोबतच बॉलिवूडचे आणखी दोन दिग्गज अक्षय कुमार आणि भूषण कुमार यांनीही यावर बोली लावली होती. कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी-सिरीज), सुपरसोनिक टेक्नोबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड (अक्षय कुमार, मोडक फिल्म्स) आणि 4 लायन्स फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी देखील हा प्रोजेक्ट मिळावा यासाठी बोली लावली होती.

Boney Kapoor
Amy Jackson Birthday: ब्रिटिश मॉडेल असतानाही ३ भारतीय भाषांच्या चित्रपटांमध्ये काम, एमी जॅक्सनचा थक्क करणारा फिल्मी प्रवास

फिल्म सिटीचा हा प्रोजेक्ट उत्तर प्रदेश सरकार आणि सीएम योगी आदित्यनाथ यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे मानला जात आहे. सुमारे 1000 एकर जागेवर ही फिल्म सिटी उभारली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांत जेवर एअरपोर्टजवळ असणाऱ्या यमुना एक्स्प्रेस वेजवळच ही फिल्म सिटी उभारण्यात येणार आहे. या एअरपोर्टमुळे फिल्म सिटीला खूप फायदा होणार आहे.

Boney Kapoor
Jaya Bachchan: लग्नानंतर रोमान्स कमी होतो, नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये असं का म्हणाल्या जया बच्चन?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com