Bajrangi Bhaijaan Movie : 'जय श्री राम'वर सेन्सर बोर्डाला आक्षेप, कबीर खान 'तो' सीन वाचवण्यासाठी भिडला होता

CBFC And Kabir Khan Argument : 'बजरंगी भाईजान' चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी चित्रपटासंबंधित मुलाखत दिली आहे. मुलाखतीत दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या सीन्सबद्दल भाष्य केले आहे.
Bajrangi Bhaijaan Movie
CBFC And Kabir Khan Argument In Bajrangi Bhaijaan MovieSaam Tv
Published On

अभिनेता सलमान खान बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर सेलिब्रिटींपैकी एक आहे. सलमानने त्याच्या करियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. त्या हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे, 'बजरंगी भाईजान'. सलमान खानच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'बजरंगी भाईजान' ठरलाय. नुकतंच चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी चित्रपटासंबंधित मुलाखत दिली आहे. मुलाखतीत दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या सीन्सबद्दल भाष्य केले आहे.

Bajrangi Bhaijaan Movie
Shah Rukh Khan Trolled : फोटोसाठी शाहरुख खानने म्हाताऱ्या माणसाला ढकललं, VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतापले

चित्रपटातील काही दृश्य आणि काही डायलॉग सेन्ट्रल बोर्डाने चित्रपटातून हटवण्यास सांगितले होते. यावरून चित्रपटाची टीमची खूपच चर्चा झाली होती. त्या मुद्द्यावरून दिग्दर्शकाने मुलाखतीत भाष्य केले आहे. एका मुलाखतीत दिग्दर्शक कबीर खानने सांगितले की, "जेव्हा मौलाना (ओम पूरी) सलमानला खुदा हाफिज बोलायला सांगतात, तेव्हा सलमान शांत होतो. ही गोष्ट ओम पूरी पाहतात."

Bajrangi Bhaijaan Movie
Sara Ali Khan Net Worth : आलिशान घर अन् महागड्या गाड्या…; सारा अली खान आहे कोट्यवधींची मालकीण

"दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा तुमच्याकडे काय बोलतात ? असा प्रश्न ओम पूरी यांनी सलमानला विचारला. तर ओम पूरींच्या त्या प्रश्नावर नवाझुद्दीनने 'जय श्री राम' असं उत्तर दिलं. तेव्हा मस्जिदचे मौलाना 'जय श्री राम'चा जयघोष करतात. हा सीन पाहून सेन्सॉर बोर्डने डिलिट करण्याची मागणी केली होती. या सीनवरून दोन धर्मांतील व्यक्तींच्या भावना दुखावतील, त्यामुळे सेंट्रल बोर्डाकडून हा सीन कॅन्सल करण्याची मागणी केली जात होती."

Bajrangi Bhaijaan Movie
Bigg Boss Marathi 5 : कपड्यांची फेकाफेकी अन् कॅप्टनसोबत धक्काबुक्की; निक्कीच्या कल्ल्याने झाली आठवड्याची सुरुवात

"या मुद्द्यावरून मी सेंट्रल बोर्डातील कर्मचाऱ्यांना काही प्रश्न उपस्थित केले, 'माझं नाव काय आहे ?' या प्रश्नावर त्यांनी मला काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा मी म्हणालो, 'मी सुद्धा मुस्लिम आहे. तर मला नाही वाईट वाटलं. मला तर उलट खूप चांगलं वाटलं.' तरीही ते मला विरोधच करत होते. मी ते डायलॉग बदलणार नाही, या निर्णयावर ठाम होतो. शेवटी त्यांनी माझी मागणी मान्य केली आणि ते डायलॉग्स तसेच ठेवले."

चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्या डायलॉगवर कशी प्रतिक्रिया दिली आहे, त्याबद्दलही दिग्दर्शकांनी सांगितले, "२०१५ मध्ये ईदच्या दरम्यान हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी मी सुद्धा थिएटरमध्ये चित्रपट पाहत होतो. त्या डायलॉगच्या वेळी प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद मिळाला."

Bajrangi Bhaijaan Movie
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात होणार वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री ? रितेशने स्पर्धकांना दिला 'भाऊचा धक्का'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com