Happy Birthday Anil Kapoor: 'मिस्टर इंडिया'चे 'या' चित्रपटांनी पालटले कायमचे आयुष्य, संपत्ती वाचाल तर येईल आकडी...

रिअल लाईफमध्ये नाही तर चित्रपटात एका दिवसासाठी का होईना मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणाऱ्या अनिल कपूर यांचा आज वाढदिवस.
Anil Kapoor
Anil KapoorSaam Tv
Published On

Happy Birthday Anil Kapoor: रिअल लाईफमध्ये नाही तर चित्रपटात एका दिवसासाठी का होईना मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणाऱ्या अनिल कपूर यांचा आज वाढदिवस. आपल्या सिनेकारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेली भूमिका म्हणजे नायक चित्रपटातील मुख्यमंत्र्यांची. आपल्या डॅशिंग अंदाजाने चाहत्यांना वेड लावणारा अभिनेता आज ६७ वर्षांचा होत आहे. अनिल कपूर यांचे वय पाहता आजही इतके फिट आहेत की आजच्या बॉलिवूड कलाकारांची त्यांच्यासमोर स्टाईल फिकी पडेल.

Anil Kapoor
Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरामध्ये वादांची मालिका सुरूच, 'फालतू बाई...' आरोहाच्या या बोलण्याने राखी सावंतचा उद्रेक

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने नाव कमावणाऱ्या अनिल कपूर यांची लाईफस्टोरी फारच रंजक आहे. बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी अनेक छोट छोटे कामं करत अनिल कपूर आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवायचे. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांचा आजवरचा प्रवास आणि त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीविषयी जाणून घेऊया.

Anil Kapoor
Sajid Khan: 'साजिद खानने ऑफिसला बोलवलं आणि...' मराठी अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

अनिल कपूर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती फारच हालाखीची होती. अनिल कपूर सुरुवातीच्या काळात पैशाचा प्रश्न सोडवण्यासाठी अभिनेते राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये काम करायचे. गॅरेजमधील मिळणाऱ्या पैशांनी एक घर भाड्यानं घेतलं.

बरीच वर्ष ते भाड्यानं घेतलेल्या घरात राहत होते. अनिल कपूर आज बॉलिवूडचे बडे अभिनेते असले तरी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1980 मध्ये 'वामसा वृक्षम' या तेलुगू सिनेमातून झाली होती. त्यानंतर 1983 मधील 'वो सात दिन' या चित्रपटाने अनिल कपूर यांना ब्रेक मिळाला.

Anil Kapoor
Kangana Ranaut: कंगना रनौत पुन्हा चर्चेत; लता मंगेशकर यांच्याशी केली स्वतःची थेट तुलना

मात्र शेखर कपूरच्या 'मिस्टर इंडिया' सिनेमातून अनिल कपूर यांना खरी ओळख मिळाली. या सिनेमामुळे अनिल कपूर रातोरात स्टार झाले. या चित्रपटाची ऑफर बिग बींकडे गेली होती, पण त्यांनी ती ऑफर नाकारल्याने अनिल कपूर यांना मिळाली. मुख्यत्वे त्यांनी या भूमिकेने दिलेल्या एका संधीचे सोने करून दाखवले.

Anil Kapoor
Besharam Rang Controversy: दीपिकाच्या 'बेशरम रंग' गाण्याच्या वादावर स्मिता गोंदकर म्हणाली, 'आता भगव्या रंगाची ब्रा...

काही दिवसांपूर्वी अनिल कपूर यांनी 'कॉमेडी नाईटस विद कपिल' मध्ये सांगितले की, 'मला टपोरी मुलाची भूमिका साकारायला यायचा, कारण मी तेव्हा तसाच राहत होतो. लहानपणी मी मित्रांसोबत टपोरीपणा फार केला आहे. सोबतच अनेक चित्रपटांची तिकीटेही ब्लॅकने विकले.'

अनिल कपूर अनेक महागड्या गाड्यांचे शौकिन आहेत. त्यांच्याकडे 16 लाखांपासून 1.70 करोड रुपयांपर्यंतच्या महागड्या गाड्या आहेत. एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अनिल कपूर जवळपास 18 मिलियन डॉलर म्हणजेच 134 करोड रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. मागच्या काही वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. अभिनयासोबत अनिल कपूर ब्रँड एंडोर्समेंटमधूनही लाखो रुपये कमवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com