Sonu Sood Viral Video : 'मला कॅमेरामन बनायचंय...', सोनू सुदने व्यक्त केली इच्छा व्यक्त; अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Sonu Sood News : काल IPL 2024 चा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद हा अंतिम सामना रंगला. मॅचमधील सोनूच्या एका कृत्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
Sonu Sood Viral Video : 'मला कॅमेरामन बनायचंय...', सोनू सुदने व्यक्त केली इच्छा व्यक्त; अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Sonu Sood IPL T20 Viral VideoInstagram

काल IPL 2024 चा अंतिम सामना रंगला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर रंगला. कोलकाता नाईट रायडर्सने ११४ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित होते. अशातच सर्वांचं लक्ष वेधलं ते अभिनेता सोनू सुद ह्याने.

अभिनेता सोनू सुद त्याच्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत राहिला आहे. 'गरीबाचा मसीहा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोनूच्या एका कृत्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सध्या अभिनेत्याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आयपीएलमध्ये शुटिंग करताना दिसत आहे.

Sonu Sood Viral Video : 'मला कॅमेरामन बनायचंय...', सोनू सुदने व्यक्त केली इच्छा व्यक्त; अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
'हम २ हमारे १२' चित्रपटाला मुस्लिम संघटनांचा विरोध

सध्या सोनू सुदचा इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने 'सनरायजर्स हैदराबाद' टीमची जर्सी वेअर केलेली दिसत आहे. यावेळी तो कॅमेरामनचं काम करताना दिसत आहे. कॅमेऱ्याची ट्रॉली हातात घेऊन तो चाहत्यांची शुटिंग करताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्याने IPL T- 20 लीगमध्ये कॅमेरामन बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. म्हणून त्याने कॅमेरा हातात घेऊन हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. SRK VS KKR मॅचमध्ये जर कॅमेरामॅनची गरज असेल तर मी उपलब्ध आहे, असं म्हणाला आहे. अभिनेत्याने कॅमेरामन बनण्याची इच्छा व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली आहे.

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, "IPL T- 20 मध्ये जर कॅमेरामनची गरज असेल तर मी उपलब्ध आहे. SRK आणि KKR ला खूप खूप शुभेच्छा" सध्या सोनूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांनी त्याच्या ह्या कामाचे जोरदार कौतुक केले आहे. त्यासोबतच त्याच्या साधेपणानेही सर्वांचेच लक्ष वेधले. खरंतर अभिनेता सोनू सुदला क्रिकेटमध्ये आवड आहे. तो सेलिब्रिटी प्रीमियर लीगमध्येही काहीवेळा क्रिकेट मॅच खेळला आहे. सेलिब्रिटी प्रीमियर लीगमध्ये सोनू पंजाबच्या टीममधून मॅच खेळला आहे.

Sonu Sood Viral Video : 'मला कॅमेरामन बनायचंय...', सोनू सुदने व्यक्त केली इच्छा व्यक्त; अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Johnny Wactor Killed : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; सिनेसृष्टीत खळबळ

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचे तर, सोनू सध्या ॲक्शन-थ्रिलर 'फतेह' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो त्याच्या सामाजिक कामासोबत त्याच्या आगामी चित्रपटासाठीही तो काम करीत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सोनू दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. 'फतेह' चित्रपटाचे कथानक सायबर क्राईमच्या भीषणतेवर भाष्य करणारा आहे.

Sonu Sood Viral Video : 'मला कॅमेरामन बनायचंय...', सोनू सुदने व्यक्त केली इच्छा व्यक्त; अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Aastad Kale News : "नशीबाने अस्ताद नावाचा कोणीही सुलतान झालेला नाही...", नावावरून ट्रोलिंग होण्याबद्दल अस्ताद काळेचं परखड मत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com